आजी, नातवाने फुलविलेली केळी ‘चाले परदेशी वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:22 IST2021-01-23T04:22:06+5:302021-01-23T04:22:06+5:30

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील आजी व विद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या नातवाने शेतात पहिल्यांदाच केळीची ...

Grandmother, granddaughter's flowering banana 'Let's go abroad' | आजी, नातवाने फुलविलेली केळी ‘चाले परदेशी वाट’

आजी, नातवाने फुलविलेली केळी ‘चाले परदेशी वाट’

बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील एका शेतकरी कुटुंबातील आजी व विद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या नातवाने शेतात पहिल्यांदाच केळीची लागवड केली. लागवडीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करून केळ्यांचे गुणवत्तापूर्ण व निर्यातक्षम असे उत्पादन घेतले. गुरुवारी (दि. २१) निर्यातदार कंपनीमार्फत येथील सहा टन केळी परदेशात रवाना करण्यात आली.

बोधेगाव येथील एकबुरुजी वस्ती याठिकाणी सुशीलाबाई पाटीलबा तांबे (वय ६०) व त्यांचा नातू संकेत बाबासाहेब तांबे (वय १९) यांनी प्राथमिक शिक्षक असलेल्या बाबासाहेब तांबे यांच्या मदतीने आपल्या १ एकर शेतात साधारणतः १ हजार टिश्यूकल्चर केळी रोपांची २५ फेब्रुवारी २०२० मध्ये लागवड केली. ही रोपे त्यांनी खान्देश जळगाव येथून उपलब्ध केली. लागवडीसाठी त्यांनी गांडूळखत, शेणखत आदी सेंद्रिय खतांचा वापर करून मशागत केली.

वेळेवर मशागत, पाणी व फवारणी करून फळबाग जोपासली. साधारणपणे ११ महिन्यांत निर्यातक्षम क्वाॅलिटी व क्वाँटिटी असलेले ३० ते ३५ प्रतिकिलो वजनाचे घड खोडांना लगडले. एकरी जवळपास ४५-५० हजार रुपये खर्च आला असून, २५ ते ३० टन उत्पादन अपेक्षित आहे. तसेच या फळबागेत त्यांनी कोबीचे आंतरपीकही घेतले. केळी बागेतून आंतरपिकासह वार्षिक दोन-अडीच लाखांचे उत्पन्न हाती पडणार असल्याचे संकेत तांबे याने सांगितले.

या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी वयोवृद्ध आजी व नातवाने मेहनत घेतली. गुरुवारी निर्यातदार कंपनीमार्फत सुरुवातीच्या सहा टन केळीचे अरब देशातील ओमानला निर्यात करण्यासाठी हार्वेस्टिंग करून हवाबंद पॅकिंग करण्यात आले. यावेळी काॅन्स्ट्रोकेमचे सुजय पाटील, डिस्ट्रिक्ट सेल्स ऑफिसर सागर गायकवाड, महावीर केदार आदींसह बाबासाहेब तांबे, अमृत मराठे, सुभाष सांबरे, संतोष येन्डे, लक्ष्मण तांबे उपस्थित होते.

-----

स्थानिक बाजारपेठेत व्यापारी अत्यल्प दराने केळीची मागणी करत असल्याने शेतकऱ्यांची एकप्रकारे अडवणूक होते. परंतु, निर्यातीमुळे सध्या शेतकऱ्यांना तुलनेने चांगला दर मिळत आहे. तसेच याहून अधिक निर्यात दरासाठी गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणे आवश्यक आहे.

-रमेश बाबासाहेब थोरात,

केळी अभ्यासक, शेवगाव.

फोटो ओळी २२ बोधेगाव केळी

बोधेगाव येथील सुशीलाबाई पाटीलबा तांबे व संकेत बाबासाहेब तांबे यांनी फुलवलेल्या केळीचे परदेशात निर्यातीसाठी पॅकिंग करताना मजूर व उपस्थित शेतकरी.

Web Title: Grandmother, granddaughter's flowering banana 'Let's go abroad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.