हंगा येथे उभारणार भव्य शिवस्मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:35+5:302021-07-14T04:24:35+5:30

सुपा : पारनेर तालुक्यातील शिवकालीन ऐतिहासिक परंपरा असलेल्या हंगा गावात भव्य शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर ...

A grand Shiv Smarak will be erected at Hanga | हंगा येथे उभारणार भव्य शिवस्मारक

हंगा येथे उभारणार भव्य शिवस्मारक

सुपा : पारनेर तालुक्यातील शिवकालीन ऐतिहासिक परंपरा असलेल्या हंगा गावात भव्य शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर विभागाचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचे हंगा हे जन्मगाव असून, महाराजांच्या स्मृती जतन करण्यासाठी व महाराजांचे विचार समाजात रुजण्यासाठी हे शिवस्मारक उभारण्यात येणार आहे.

हंगा येथे उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या कामाचे भूमिपूजन आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र चौधरी होते. पिण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी देणारा जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, त्यासाठी जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांनी ५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. गावात हिरवाई निर्माण करण्यासाठी ३०० वृक्षलागवड करण्याच्या उपक्रमासही यावेळी सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ६ लाख रुपये खर्चाच्या हनुमान मंदिर परिसर काँक्रिटीकरण व दोन लाखांचे हायमास्ट यांचे लोकार्पण आमदार नीलेश लंके, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या राणीताई लंके, सरपंच बाळासाहेब दळवी, उपसरपंच वनिता शिंदे आदींच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, दादा शिंदेे, माजी सभापती सुदाम पवार, कारभारी पोटघन, जितेश सरडे, डॉ. बाळासाहेब कावरे, सुवर्णा धाडगे, सरपंंच विक्रम कळमकर, पूनमताई मुंगसे, राजेंद्र शिंदे, संजय लाकूडझोडे, चंद्रकांत मोढवे, बाळासाहेब लंके, सोमनाथ वरखडे, दौलत गांगड, चंद्रकांत ठुबेे, बाळासाहेब ब्राह्मणे, प्रकाश दळवी, भाऊसाहेब भोगाडे, संदीप मगर, नगरसेवक मुदस्सर सय्यद, किसन गंधाडे, सचिन पठारे, उमाताई बोरुडे, कल्पना औटी, संदीप रोहोकले आदींची उपस्थिती होती. प्रकाश दळवी यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब नगरे व चंद्रकांत मोढवे यांनी सूत्रसंचलन केले.

...............

गावोगाव शिवस्मारक उभारणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आज खरी गरज आहे. म्हणूनच मोठ्या गावांत मुख्य चौकात शिवस्मारक उभारणार आहे. हंगा गावातील शिवस्मारक उभे राहिल्यानंतर पारनेर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गावात अश्वारूढ पुतळा उभा करण्यात येणार आहे. कोरोनाकाळात कोविड सेंटरच्या माध्यमातून १७ हजार रुग्णांना वाचवण्यात यश आले. औषधोपचार, तपासणी, आहार, उपचार, असा जवळपास २०० कोटी रुपये जनतेचे वाचल्याचे आ. लंके यांनी सांगितले.

................

शिवस्मारकासाठी मुस्लीम बांधवांकडून मदत

हंगा येथील शिवस्मारकासाठी पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक डॉ. मुदस्सर सय्यद यांनी मुस्लीम बांधवांच्या वतीने ११ हजार रुपयांची मदत जाहीर केली. महाराजांनी कधीही धर्मभेद केला नाही. त्यामुळे मुस्लीम बांधवांसाठीही हे स्मारक प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगत हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश त्यांनी दिला.

................

१३ हंगा शिवस्मारक

हंगा येथे शिवस्मारकाचे भूमिपूजन करताना आ. नीलेश लंके, जि.प. सदस्या राणीताई लंके, सरपंच बाळासाहेब दळवी आदी.

Web Title: A grand Shiv Smarak will be erected at Hanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.