भिंगार येथील उपनगरामध्ये डॉ. किशोर म्हस्के व डॉ. कौशल्या म्हस्के यांच्या म्हस्के हॉस्पिटल उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुळा एज्युकेशनचे अध्यक्ष प्रशांत गडाख, भिंगार अर्बन बँकेचे अध्यक्ष अनिल झोडगे, आमदार सुधीर तांबे, माजी मंत्री सुरेश धस, अक्षय कर्डिले, डॉ. पोपट कर्डिले, डॉ. ज्ञानेश्वर थोरात, डॉ. दीपक जाधव, डॉ. राहुल हजारे, डॉ. सुजीत कोठुळे, डॉ. नितीन चौधरी, डॉ. कमलेश बोरा, डॉ. नंदराम सोनवणे, डॉ. मनोज पाडळकर, डॉ. दिलीप गुरुले आदी उपस्थित होते.
यावेळी डाॅ. दीपक म्हणाले, चाळीस वर्षांच्या सेवेत मी हजारो डॉक्टरांना शिकवले. प्रत्येक रुग्णाला माणुसकीची वागणूक द्या, हा जो रुग्णसेवेचा मंत्र मी दिला, तो ज्या माझ्या शिष्यांनी ऐकला ते आज टॉपमध्ये आहेत.
५० बेडस , मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, १० बेडसचा अतिदक्षता विभाग, सेंट्रल ऑक्सिजन फॅसिलिटी, ट्रामा सेंटर, डायलिसीस युनिट, फिजियोथेरपी, पॅथॉलॉजिकल लॅब, पंचकर्म सुविधा, वंध्यत्व व जीर्ण व्याधी उपचार, सीटी स्कॅन, डिजीटल एक्स-रे, सोनोग्राफी, व्हेंटिलेटर आदी सुविधा उपलब्ध असल्याचे डाॅ. म्हस्के यांनी सांगितले. (वा.प्र.)
---------
फोटो - २७म्हस्के हाॅस्पिटल