ग्रामसेवक विकासाचा दूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:22 IST2021-01-03T04:22:21+5:302021-01-03T04:22:21+5:30

अहमदनगर : सभासदांना भरीव कर्ज, ठेवीवर उत्तम व्याज अशा योजना राबविताना ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे काम कौतुकास्कपद आहे. ग्रामीण भागात ...

Gramsevak is the messenger of development | ग्रामसेवक विकासाचा दूत

ग्रामसेवक विकासाचा दूत

अहमदनगर : सभासदांना भरीव कर्ज, ठेवीवर उत्तम व्याज अशा योजना राबविताना ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे काम कौतुकास्कपद आहे. ग्रामीण भागात विकासाचा दूत म्हणून ग्रामसेवकांचे स्थान आहे. त्यांनी शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये पांडुरंग पाहून त्यांची सेवा केली पाहिजे. नगर जिल्ह्यात शासकीय योजनांची अतिशय प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामसेवकांनी सातत्याने प्रयत्नशील रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले.

अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेकडून वाढीव सर्वसाधारण कर्जमर्यादेनुसार सभासदांना कर्जाच्या धनादेशाचे वितरण नववर्षदिनी करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना क्षीरसागर बोलत होते. कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष तथा संस्थेचे मानद सचिव एकनाथ ढाकणे, संस्थेचे चेअरमन विजयकुमार बनाते, व्हाईस चेअरमन शीतल पेरणे-खाडे, संचालक रामदास डुबे, सुनील नागरे, राजेंद्र पावसे, संजय घुगे, मधुकर जाधव, नवनाथ पाखरे, मंगेशकुमार पुंड, विलास काकडे, रखमाजी लांडे, एकनाथ आंधळे, रमेश बांगर, नारायण घेरडे, महेश जगताप, सचिन मोकाशी, विशाल काळे, डॉ. धर्माजी फोफसे, अभय सोनवणे, रोहिणी नवले, सभासद अशोक नरसाळे, युवराज पाटील, तात्यासाहेब ढोबे, दादा भिंगारदे, अरुण जेजरकर, बाळासाहेब कडू आदी उपस्थित होते.

भोर म्हणाले की, ग्रामसेवकांच्या पतसंस्थेचे कामही अतिशय उत्कृष्ट व शिस्तबद्ध असून सभासदांचे हित साधणारा कारभार याठिकाणी होतो, हे कौतुकास्पद आहे.

प्रास्ताविकात ढाकणे म्हणाले की, संस्थेने सर्वसाधारण कर्जमर्यादा २१ लाखांपर्यंत नेली आहे. ग्रामसेवक परिवार योजनेअंतर्गत सभासदाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसास ५ लाख रुपये तातडीची मदत देण्यात येते. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सभासदांना बँकिंग सेवा दिली जाते. सूत्रसंचालन चेअरमन विजयकुमार बनाते यांनी केले तर राजेंद्र पावसे यांनी आभार मानले.

------------

फोटो - ०२ ग्रामसेवक पतसंस्था

जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेकडून वाढीव सर्वसाधारण कर्जमर्यादेनुसार सभासदांना कर्जाच्या धनादेशाचे वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जगन्नाथ भोर, एकनाथ ढाकणे आदी.

Web Title: Gramsevak is the messenger of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.