बहुतांश गावांतील ग्रामपंचायत सदस्य सहलीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:59+5:302021-02-06T04:38:59+5:30
जामखेड : तालुक्यातील ४९ पैकी ४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड जाहीर झाली आहे. ९ फेब्रुवारीला २४ ग्रामपंचायतींच्या तर १० फेब्रुवारीला ...

बहुतांश गावांतील ग्रामपंचायत सदस्य सहलीवर
जामखेड : तालुक्यातील ४९ पैकी ४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड जाहीर झाली आहे. ९ फेब्रुवारीला २४ ग्रामपंचायतींच्या तर १० फेब्रुवारीला २३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांची निवड होणार आहे. यामुळे सरपंचपदाच्या निवडीसाठी गावोगावच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बहुतांश गावांतील ग्रामपंचायत सदस्य अज्ञातस्थळी सहलीला रवाना झाले आहेत.
तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यातील वाकी व साकत ग्रामपंचायत सरपंचपदाची निवड राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलली आहे. त्यामुळे ४७ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश सदस्य अज्ञातस्थळी सहलीला रवाना झाले आहेत. बहुतेक सर्व ग्रामपंचायत सरपंच निवडीसाठी रस्सीखेच दिसून येत आहे. अनेक ठिकाणी रूसवेफुगवे दिसून येत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता आहे, असे एकंदर चित्र आहे.
९ फेब्रुवारीला सरपंचपदाची निवड होणारी गावे अशी- : कुसडगाव, देवदैठण, सोनेगाव, पाटोदा, तेलंगसी, डोणगाव, पाडळी, चोंडी, धानोरा, अरणगाव, नायगाव, नाहुली, दिघोळ, पोतेवाडी, खर्डा, पिंपळगाव आळवा, पिंपळगाव उंडा, कवडगाव, जातेगाव, चोभेवाडी, सातेफळ, झिक्री, वाघा, मोहा.
तर १० फेब्रुवारीला सरपंच निवड होणारी गावे अशी- : बाळगव्हाण, मोहरी, राजेवाडी, धोंडपारगाव, घोडेगाव, खुरदैठण, तरडगाव, पिंपरखेड, धामणगाव, नान्नज, गुरेवाडी, आघी, खांडवी, जवळके, आपटी, सारोळा, लोणी, बोरले, आनंदवाडी, जायभायवाडी, बावी, सावरगाव, बांधखडक.