पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या हालचाली

By Admin | Updated: September 22, 2015 00:22 IST2015-09-22T00:20:14+5:302015-09-22T00:22:03+5:30

अहमदनगर : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून, निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीसह यादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे़

Graduation Constituency Election Movement | पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या हालचाली

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या हालचाली

अहमदनगर : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून, निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीसह यादी अद्ययावत करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे़ मतदारयादीत समाविष्ट असलेल्या मतदारांकडूनही विविध २० मुद्यांची माहिती मागविली आहे़ ही माहिती देण्याची अंतिम मुदत २४ सप्टेंबर आहे़
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २०१६ मध्ये होत आहे़ या निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे़ निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे़ सन २०१० मध्ये झालेल्या निवडणूक मतदारयादीत ज्या मतदारांची नावे नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयादीत समाविष्ट होती, अशा मतदारांना अर्ज भरून देणे बंधनकारक आहे़ हा अर्ज संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध असून, तो अर्ज भरून देण्यासाठीची अंतिम मुदत २४ सप्टेंबर आहे़ त्यापूर्वीच मतदारांनी ही माहिती कार्यालयास देण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ नव्याने नाव नोेंदणी करण्याबरोबरच नाव समाविष्ट असलेल्या मतदारांचीही माहिती मागविण्यात आली आहे़
मतदारयादी अद्ययावत केल्यानंतर ही यादी प्रसिध्द केली जाणार आहे़ प्रसिध्द झालेल्या यादीवर हरकती मागविल्या जातील़ अंतिम यादी डिसेंबरमध्ये प्रसिध्द केली जाणार आहे़ जानेवारीत पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: Graduation Constituency Election Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.