गोविंदराव आदिक यांनी सामान्यांसाठी योगदान दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:03+5:302021-01-08T05:04:03+5:30

श्रीरामपूर येथे गोविंदराव आदिक यांच्या ८२ व्या जन्मदिनानिमित्त कृषक समाजाच्या वतीने नगराध्यक्षा अनुराधा आदिक व अविनाश आदिक यांनी साखर ...

Govindrao Adik contributed for the common man | गोविंदराव आदिक यांनी सामान्यांसाठी योगदान दिले

गोविंदराव आदिक यांनी सामान्यांसाठी योगदान दिले

श्रीरामपूर येथे गोविंदराव आदिक यांच्या ८२ व्या जन्मदिनानिमित्त कृषक समाजाच्या वतीने नगराध्यक्षा अनुराधा आदिक व अविनाश आदिक यांनी साखर कामगार रुग्णालयास कार्डियाक मॉनिटर प्रदान केले. यावेळी आदिक बोलत होते. रुग्णालयाचे विश्वस्त अविनाश आपटे, पुष्पाताई आदिक, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, डॉ. रवींद्र जगधने, डॉ. बापूसाहेब आदिक, नगरसेवक अंजूम शेख, उत्तमराव पवार, कांतीलाल लोढा, रमेश लोढा आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी जैन समाजाचे अध्यक्ष रमेश लोढा, कांतीलाल लोढा यांनी साधना विलास लोढा यांच्या स्मृती प्रीत्यर्थ कार्डियाक मॉनिटरसाठी ८४ हजार रुपयांचा धनादेश अविनाश आपटे यांच्याकडे सुपुर्द केला.

अविनाश आपटे यांनी गोविंदराव आदिक यांचे रुग्णालयाच्या उभारणीत व मदतीमध्ये मोलाचे योगदान असून अनुराधा आदिक व अविनाश आदिक यांचेही दरवर्षी सहकार्य लाभत असल्याचे सांगितले.

प्रास्तविक नगरसेवक राजेंद्र पवार यांनी केले. यावेळी निलोफर शेख, शामलिंग शिंदे, भाऊसाहेब डोळस, मुख्तार शहा, दीपक चव्हाण, प्रकाश ढोकणे, रईस जहागीरदार, ताराचंद रणदिवे, बाळासाहेब गांगड, रवी पाटील, कलीम कुरेशी, अल्तमेश पटेल, कैलास बोर्डे, योगेश जाधव, लकी सेठी, यावेळी विमलबाई लोढा, राखी लोढा, रश्मी लोढा, राजश्री वावसे उपस्थित होते.

-------

फोटो : ०४ आदिक जयंती

..

ओळी- दिवंगत खा. गोविंराव आदिक यांच्या ८२ व्या जयंतीनिमित्त आदिक परिवाराच्या वतीने कामगार रुग्णालयास कार्डियक मॉनिटर भेट देताना पुष्पलता आदिक, अविनाश आदिक, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, कामगार नेते अविनाश आपटे आदी.

-----

Web Title: Govindrao Adik contributed for the common man