मांडवगण येथे शासकीय तूर खरेदी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST2021-01-25T04:21:21+5:302021-01-25T04:21:21+5:30

मांडवगण : केंद्र सकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मार्केटिंग फेडरेशन व जिल्हा मार्केटिंग ...

Government Tur Shopping Center at Mandvagan | मांडवगण येथे शासकीय तूर खरेदी केंद्र

मांडवगण येथे शासकीय तूर खरेदी केंद्र

मांडवगण : केंद्र सकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मार्केटिंग फेडरेशन व जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार ‘जय किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित मांडवगण’ या संस्थेस शासकीय तूर व हरभरा खरेदी केंद्राची मान्यता मिळाली आहे. शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी संस्थेच्या निंबोडी चौक मांडवगण (ता.श्रीगोंदा) येथील कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संजय आनंदकर यांनी केले आहे.

श्रीगोंदा तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर तुरीचे उत्पादन झाले आहे. तुरीला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव शासनाने निश्चित केला आहे. यासाठीची सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने केली जाणार असल्याने नोंदणीसाठी पीक नोंदणी असलेला ऑनलाइन ७/१२ व ८ अ उतारा, आधारकार्डशी संलग्न असणारे बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, मोबाइल क्रमांक ही कागदपत्रे जमा करावीत. नोंदणी केल्यानंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर शेतकऱ्यांना एसएमएस पाठविला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Government Tur Shopping Center at Mandvagan