छावण्याबाबत शासनाचा वेळ काढूपणा - प्राजक्त तनपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 16:33 IST2019-02-06T16:32:20+5:302019-02-06T16:33:03+5:30

प्रत्येक मंडल विभागात एकच छावणी, छावणीत कमीत - कमी ३०० जनावरे असली पाहिजेत. संचालकावर कोणत्याही स्वरूपाचा गंभीर गुन्ह्याची नोंद नसली पाहिजे तसे प्रमाणपत्र जोडले पाहिजे,

Government time to cover camps - Prajakta Tanpuray | छावण्याबाबत शासनाचा वेळ काढूपणा - प्राजक्त तनपुरे

छावण्याबाबत शासनाचा वेळ काढूपणा - प्राजक्त तनपुरे

करंजी : प्रत्येक मंडल विभागात एकच छावणी, छावणीत कमीत - कमी ३०० जनावरे असली पाहिजेत. संचालकावर कोणत्याही स्वरूपाचा गंभीर गुन्ह्याची नोंद नसली पाहिजे तसे प्रमाणपत्र जोडले पाहिजे, अशा प्रकारच्या जाचक अटींचा सामना छावणी चालकास करावा लागत असून, छावण्याच्या प्रकरणात हे शासन वेळ काढूपणा करित असल्याची टीका प्राजक्त तनपुरे यांनी केली.
करून गावा- गावात जनावरांच्या छावण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

भोसे येथील काराचा माथा येथील लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या छावणीस भेट दिली. त्यावेळी तनपुरे बोलत होते.
तनपुरे म्हणाले, राज्यात दुष्काळ जाहिर करून दोन महिने होवून गेले, परंतू शासकिय पातळीवर कोणतीही हालचाल होत नसल्याने या भागातील तरुणांनी, स्वयंसेवी संस्थांनी पुढे येवून लोकसहभागातून जनावरांसाठी छावण्या सुरु करताच या सरकारला जागा आली. परंतू प्रत्येक गोष्ट शेतक-यांना सहजा-सहजी द्यायची नाही असा चंग बांधलेल्या या सरकारने छावण्या सुरु करणा-या संस्थांना जाचक अटी घातल्या आहेत. या भागातील अनेक संस्था या अटी पुर्ण करू शकणार नसल्याने तसेच छावण्यांच्या परवानगी प्रक्रियेस जाणून -बुजुन प्रशासन विलंब करित असून शासन शेतक-यांच्या जिवाशी खेळत असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी माजी सभापती संभाजीराव पालवे, सातवडचे उपसरपंच राजेंद्र पाठक, रावसाहेब गुंजाळ, अशोक टेमकर, अजय पाठक, मतिन मणियार व छावणीचे चालक साईनाथ घोरपडे, विलास टेमकरसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Government time to cover camps - Prajakta Tanpuray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.