दूध उत्पादकांना लुटणा-या दुध संघाचे सरकारने ऑडिट करावे - अजित नवले यांची मागणी, लाखगंगा गावात ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 12:49 IST2021-06-18T12:47:41+5:302021-06-18T12:49:29+5:30
मधू ओझा पुणतांबा : लॉकडाऊनमध्ये जसे रुग्णालयाचे सरकारने ऑडिट केले तोच नियम दूध उत्पादकांची जी लुट झाली, त्या दूध संघाचे पण सरकारने ऑडिट करावे. पुन्हा एकदा पुणतांबा आंदोलन करणयासाठी शेतकऱ्यांना मजबूर करू नका, असे शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकारला ठणकावले.

दूध उत्पादकांना लुटणा-या दुध संघाचे सरकारने ऑडिट करावे - अजित नवले यांची मागणी, लाखगंगा गावात ग्रामसभा
मधू ओझा
पुणतांबा : लॉकडाऊनमध्ये जसे रुग्णालयाचे सरकारने ऑडिट केले तोच नियम दूध उत्पादकांची जी लुट झाली, त्या दूध संघाचे पण सरकारने ऑडिट करावे. पुन्हा एकदा पुणतांबा आंदोलन करणयासाठी शेतकऱ्यांना मजबूर करू नका, असे शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकारला ठणकावले.
वैजापूर तालुक्यातील लाखगंगा गावात आज दूध दरवाढ व इतर मागण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. लाखगंगा गावच्या सरपंच उज्वला सचिन पडोळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा सपन्न झाली. या ग्रामसभेतील ठराव वाचन ग्रामविकास अधिकारी एस. जे. राठोड यांनी केले तर या ठरावाचे सूचक राजेंद्र तुरकने तर अनुमोदन विलास मोरे यांनी दिले. या ग्रामसभेत सर्व ग्रामस्थ मिळून एक मताने दूध दरवाढ, लॉकडाऊनचा या गैरफायदा घेत खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर १० ते १५ रुपयांनी पाडले आहेत. शेतकर्यांना यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे . प्रत्यक्षामध्ये मागणी किती कमी झाली व त्यामुळे दरामध्ये किती घट करणे अपेक्षित आहे. याचा कुठलाही ताळमेळ स्पष्ट न करता, दूध उत्पादकांच्या असहाय्यतेचा फायदा दूध संघ व दूध कंपन्यांकडून घेतला जात आहे, अशा पार्श्वभूमीवर या लुटमारीच्या विरोधामध्ये राज्यव्यापी संघर्ष उभा करण्याची भूमिका घेत दरवाढ मिळावी. लॉकडाऊनच्या काळात दूध उत्पादकांच्या झालेल्या लुटीची चौकशी करा, दोषींवर कारवाई करा व दुध उत्पादकांची केलेली लूट वसूल करून ती परत करा, अशी लूट रोखण्यासाठी कायदे करा. ऊस धंद्याप्रमाणेच दूध व्यवसायासाठी सुद्धा एफ. आर. पी. व रेव्हेन्यू शेअरींगचे दुहेरी संरक्षण लागू करा, दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर पावले उचला, एक राज्य एक ब्रँड स्वीकारून राज्यात सुरू असणारी अनिष्ट ब्रँड कॉम्पिटिशन थांबवा. या प्रमुख मागण्या करणारा ठराव ग्रामसभा घेऊन करण्यात आले. तर राज्यव्यापी आंदोलन उभारणार असे किसान सभेचे अजित नवले यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले. जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, बाजार समितीचे सदस्य ज्ञानेश्वर जगताप, धनंजय धोर्डे, धनंजय धनवटे, राजेंद्र कराळे, दिगंबर तुरकने, अजिनाथ तुरकने,दिलीप तुरकने यादी ग्रामस्थ उपस्तीत होते.