शासनाचे ख्रिस्ती समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:56+5:302021-06-09T04:25:56+5:30
भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, देशातील विविध ख्रिस्ती संघटनांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न होत आहेत; परंतु ...

शासनाचे ख्रिस्ती समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, देशातील विविध ख्रिस्ती संघटनांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न होत आहेत; परंतु पाहिजे तशी गती येत नाही. समाजातील महिलांचे प्रश्न, तरुणांची वाढती बेरोजगारी, उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही आर्थिक परिस्थितीमुळे अनेक होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना वंचित रहावे लागणे, त्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा आधारही दुबळा होत असून, अल्पसंख्याक व इतर योजनेचा लाभ मिळवतानाही मोठी कसरतच करावी लागत आहे. याबरोबरच ख्रिस्ती संस्थांमध्ये सुद्धा समाजातील गरजू व्यक्तींचा सहभाग कटाक्षाने वाढावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
वीस वर्षांपासून सर्वपंथीयांना एकत्र आणून राज्यात मजबूत संघटनेची बांधणी होत आहे. समाजाला याचा आनंद आहे. आता राज्यकर्त्यांनी देखील जाणिवेने समाजाकडे लक्ष पुरविले पाहिजे. आजपर्यंत समाजाला आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही, याची खंत वाटते. समाज राजकीय इच्छाशक्तीची वाट पाहत आहे. म्हणूनच राज्यकर्त्यांनी तसेच ख्रिस्ती संस्थांनी देखील न्याय्य भूमिकेतून समाजाकडे बघावे. महाराष्ट्रातील सर्वपंथीय ख्रिस्ती समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री व महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना भेटून त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.