शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची सरकारला ४६४ रु. भीक, मुख्यमंत्र्यांना मनीआॅर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 05:27 IST

शेतक-यांच्या मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीने सुरू केलेल्या ‘देता का जाता’ आंदोलनादरम्यान गुरुवारी पुणतांब्याच्या शेतकºयांनी सरकारसाठी झोळीत भीक मागितली.

शिर्डी  - शेतकºयांच्या मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीने सुरू केलेल्या ‘देता का जाता’ आंदोलनादरम्यान गुरुवारी पुणतांब्याच्या शेतकºयांनी सरकारसाठी झोळीत भीक मागितली. यामध्ये जमा झालेले ४६४ रुपये मनीआॅर्डरद्वारे मुख्यमंत्र्यांना पाठविले. चौथ्या दिवशी अन्नत्याग करणाºया शुभांगी जाधव हिची प्रकृती खालावली आहे. आंदोलन मागे घ्यावे यासाठी शिष्टाई करण्यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे पुणतांब्यात दाखल झाले आहेत.शेतीमालाला हमीभाव मिळावा, संपूर्ण कर्जमाफी करावी यासह शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीने सरकारच्या निषेधार्थ रथयात्रा काढली आहे. त्यास पाठिंबा देत पुणतांबा येथील निकिता जाधव, शुभांगी जाधव, पूनम जाधव या कृषिकन्यांसह काही महिलांनी ४ दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. चौथ्या दिवशी ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आंदोलनकर्त्यांची आरोग्य तपासणी केली.आंदोलनादरम्यान शुभांगी जाधव हिची रक्तातील साखर कमी होऊन प्रकृती ढासळल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने प्रशासनास कळविले. राहात्याचे तहसीलदार माणिक आहेर व पोलीस निरीक्षक परदेशी यांनी भेट देऊन जाधव हिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र मागण्या मान्य होऊन आंदोलनाला यश मिळत नाही, तोवर तिने उपचारांस नकार दिला आहे.चार दिवसांपासून अन्नत्यागपुणतांबा येथील शेतकºयांच्या चार मुलींनी चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शेतकºयांचा सातबारा कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या, दुधाला ५० रुपये प्रतिलीटर भाव आदी मागण्यांसाठी आंदोलन आहे. किसान क्रांती संघटनेच्या बॅनरखाली सदरचे आंदोलन आहे. किसान क्रांतीचे राज्य समन्वयक धनंजय जाधव यांची कन्या निकीता या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे. ३ जून २०१७ रोजी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. पुणतांबा गावातून ‘देता की जाता’असा इशारा देत किसान क्रांती संघटनेच्या वतीने राज्यभर यात्रा सुरु आहे. त्याच आंदोलनाचा दुसरा भाग म्हणून पुणतांबामधील कृषिकन्या आक्रमक झाल्या आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी