शेतकऱ्यांच्या समस्यांवर उत्तरे शोधण्यात सरकार अपयशी - अण्णा हजारे
By Admin | Updated: June 8, 2017 14:18 IST2017-06-08T14:18:31+5:302017-06-08T14:18:31+5:30
सध्या राज्यासह देशात शेतकऱ्यांचेच प्रश्न ज्वलंत आहेत़ या ज्वलंत प्रश्नांवर अजुनही शासनाला उत्तरे शोधता आली नाहीत़

शेतकऱ्यांच्या समस्यांवर उत्तरे शोधण्यात सरकार अपयशी - अण्णा हजारे
आॅनलाईन लोकमत
पारनेर, दि़ ८ - सध्या राज्यासह देशात शेतकऱ्यांचेच प्रश्न ज्वलंत आहेत़ या ज्वलंत प्रश्नांवर अजुनही शासनाला उत्तरे शोधता आली नाहीत़ म्हणून शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले़
नगर जिल्हा कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाच्या वतीने उन्नत शेती, प्रगत शेती या अभियानाची जिल्हास्तरीय कार्यशाळा गुरूवारी राळेगणसिध्दी येथे झाली़ यावेळी बोलताना हजारे म्हणाले, सध्याची शेती ही परवडणारी नाही़ त्यामुळे शेतकरी संकटात आहेत़ परंतु ज्या शेतकऱ्यांनी उन्नत शेतीचे प्रयोग केले आहेत़ त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर असे प्रयोग पोहोचवले पाहिजे़ कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना या सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत़ यामुळे शेतकरी समृध्दीला काहीतरी वाव मिळेल़ सध्यातरी आपल्याकडील शेतकरी पावसावर अवलंबून असल्याने शेतकरी नेहमी संकटातच असतो़ त्यामुळे सिंचनाची व्यवस्था होणे गरजेचे आहे़ आत्माचे प्रकल्प संचालक भाउसाहेब बऱ्हाटे म्हणाले, राज्य शासनाने आत्मा प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध नवनवीन प्रयोग राबवण्याचे नियोजन केले आहे़ त्यानुसार आता पांरपारीक बियाणांच्या माध्यमातून उन्नत शेती अभियान राबवले जात आहे़ यावेळी तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर, आत्माचे पारनेरचे प्रकल्प प्रमुख देवेंद्र जाधव आदींसह जिल्यातील अधिकारी व शेतकरी उपस्थित होते़