गुगळे पतसंस्थेची आरोळे हॉस्पिटलला दीड लाखाची औषधे भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:21 IST2021-05-08T04:21:56+5:302021-05-08T04:21:56+5:30

जामखेड : दीड वर्षापासून आरोळे हाॅस्पिटल कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करीत आहे. रुग्णांवर उपचार करताना औषधांची सातत्याने गरज ...

Google Credit Union donates Rs 1.5 lakh worth of medicines to Arole Hospital | गुगळे पतसंस्थेची आरोळे हॉस्पिटलला दीड लाखाची औषधे भेट

गुगळे पतसंस्थेची आरोळे हॉस्पिटलला दीड लाखाची औषधे भेट

जामखेड : दीड वर्षापासून आरोळे हाॅस्पिटल कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करीत आहे. रुग्णांवर उपचार करताना औषधांची सातत्याने गरज पडत आहे. ही बाब आरोळे हाॅस्पिटलचे संचालक रवी आरोळे यांनी एच.यू. गुगळे पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश गुगळे यांच्या लक्षात आणून दिली. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या रमेश गुगळे यांनी रवी आरोळे यांच्या मागणी यादीप्रमाणे आवश्यक असणाऱ्या दीड लाख रुपयांची औषध मोफत मदत म्हणून दिली. शुक्रवारी कोविड सेंटरला रवी आरोळे यांच्याकडे औषधांची मदत देण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे संचालक मुकुल गुगळे, अशोक गांधी, व्यवस्थापक वैभव कुलकर्णी, कॅशियर जुबेर पठाण, विठ्ठल कुलकर्णी, आरोळे हॉस्पिटलच्या सुलताना शेख, सारिका इंगळे, ब्रह्मदेव भिडे, प्रशांत कुलकर्णी, दत्ता जगताप आदी उपस्थित होते.

---

०७ जामखेड आरोळे

Web Title: Google Credit Union donates Rs 1.5 lakh worth of medicines to Arole Hospital