‘अमृतवाहिनी’च्या अभियांत्रिकी महाविद्यालयास सुवर्ण चषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:39+5:302021-06-19T04:14:39+5:30
राष्ट्रीय पातळीवरील आयोजित स्पर्धेत विविध उद्योग समूह, शिक्षण संस्था सहभागी झाल्या होत्या. यात अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ...

‘अमृतवाहिनी’च्या अभियांत्रिकी महाविद्यालयास सुवर्ण चषक
राष्ट्रीय पातळीवरील आयोजित स्पर्धेत विविध उद्योग समूह, शिक्षण संस्था सहभागी झाल्या होत्या. यात अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला. ४०० किलो वॅट सौर ऊर्जा प्रकल्प, पाच किलो वॅट हायब्रीड पवन ऊर्जा प्रकल्प, तसेच मायक्रोप्रोसेसर बेस्ट ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोल युनिट कार्यान्वित करण्यात आल्याने विजेच्या बाबत महाविद्यालय स्वयंपूर्ण झाले आहे. शिल्लक वीज महावितरणला देण्यात देते. परिसरात एक हजार किलो क्षमतेच्या बायोगॅस प्रकल्पाद्वारे महाविद्यालयातील पालापाचोळा, उपाहारगृहातील टाकाऊ पदार्थ आणि घनकचरा व्यवस्थापन होऊन त्याद्वारे ऊर्जा निर्मितीचे साधन तयार झालेले आहे. महाविद्यालयातील वसतिगृहांसाठी बसवलेल्या ४१ हजार लिटर क्षमतेच्या सोलर वॉटर हिटरच्या माध्यमातून ऊर्जा बचतीचे मोठे काम करण्यात आले आहे.
आतापर्यंत २ लाख ५१ हजार ४८७ युनिट वीज महावितरणला निर्यात केली आहे. हा प्रकल्प इतर शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये आदर्श ठरत आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रायोगिक शिक्षण सौरऊर्जेच्या प्रकल्पातून मिळत असून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मानवी संसाधन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. या सर्व बाबींचा विचार करत क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे यांच्यावतीने दिला जाणारा राष्ट्रीय पातळीवरील प्रथक क्रमांकाचा पुरस्कार महाविद्यालयास जाहीर झाला आहे.
संस्थेचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, शरयू देशमुख, उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, रजिस्टर प्रा. व्ही.पी वाघे आदींनी कौतुक केले.
....................
फोटो नेम : १८ अमृतवाहिनी, संगमनेर,
ओळ : अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय