श्रीगोंद्याच्या मातीतले सुवर्ण

By Admin | Updated: December 14, 2015 20:38 IST2015-12-14T20:38:02+5:302015-12-14T20:38:02+5:30

श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील आठ खेळाडूंनी कठोर परिश्रम घेत राष्ट्रीय व राज्य ग्रामीण मैदानी स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात सवरेत्तम कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली आहे

Gold of Shrigodudi soil | श्रीगोंद्याच्या मातीतले सुवर्ण

श्रीगोंद्याच्या मातीतले सुवर्ण

बाळासाहेब काकडे - श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील आठ खेळाडूंनी कठोर परिश्रम घेत राष्ट्रीय व राज्य ग्रामीण मैदानी स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात सवरेत्तम कामगिरी करत सुवर्णपदकांची लयलूट केली आहे. या खेळाडूंच्या सुवर्णझेपमुळे महाविद्यालयाची राष्ट्रीय पातळीवर मान उंचावली आहे. पु णे येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय ग्रामीण मैदानी स्पर्धेत राहुल जाधव याने ४00 मीटर हर्डल्स स्पर्धेत सुवर्णपदक, अनिल पवार याने ८00 मीटर हर्डल्समध्ये सुवर्णपदक, स्वप्नील गव्हाणे याने १५00 मीटर हर्डल्समध्ये कांस्यपदक, प्रमोद आहेर याने ११0 मीटर हर्डल्समध्ये सुवर्णपदक, १९ वर्षापुढील क्रीडा स्पर्धेत हर्षद चौकडे याने २00 मीटर हर्डल्समध्ये सुवर्णपदक, विठ्ठल पवार याने ८00 मीटर हर्डल्समध्ये सुवर्णपदक तर सचिन जाधवने २१ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत पदकांची कमाई करीत सुवर्ण कामगिरी केली. नारायण घुगे याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गोवा येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेत पुन्हा सुवर्ण कामगिरी करण्यासाठी या सात खेळाडूंची टीम सज्ज झाली असून, भल्या पहाटे उठून हे खेळाडू सराव करीत आहेत. या खेळाडूंना क्रीडा संचालक सतीश चोरमले, प्रा. नामदेव शेलार, प्रा.महेश गिरमकर हे मार्गदर्शन करीत आहेत.
दज्रेदार खेळाडू तयार करण्यासाठी सेवानवृत्त क्रीडा संचालक शिवाजीराव कदम यांनी खो-खो, कबड्डी, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, हर्डल्स या मैदानी स्पर्धांची तयारी करुवून घेत असून टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन या इनडोअर खेळांसाठी ते खेळाडूंना मार्गदर्शन करतात.
सुवर्णपदक विजेत्या खेळाडू हे सर्वसामान्य घरातील असून, खेळ, शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या घरांमधील ही मुले आहेत. घरचे वातावरण चांगले नाही, कोणत्याही सुविधा नसताना केवळ श्रम आणि मार्गदर्शनाच्या बळावर या खेळाडूंनी श्रीगोंद्याचा खेळाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला आहे.
महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी वंदू गिरी, शंकर राऊत, सतीश म्हस्के, सोनल बोरुडे, कोमल जाधव, स्वप्नील ढवळे, रवींद्र काळाणे यांनी अनेक मैदाने गाजविल्याचा इतिहास नोंदवून ठेवला आहे. खेळातील कौशल्यामुळे या सातही विद्यार्थ्यांचे लाईफस्टाईल बदलले आहे.
या खेळाडूंचा आदर्श घेऊन इतर खेळाडूंनीही मैदानात नियमीत सराव करायला हवा. खेळामुळे शरीर सुदृढतेसह अनेक फायदे होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सकाळी किमान एक तास तरी रोज सराव करावा, असे हे खेळाडू सांगतात. बाळासाहेब काकडे चपळाईने खेचून आणले सुवर्ण
■ बाबुर्डीचा प्रमोद आहेर हा उंचीने अतिशय छोटा आहे. परंतु अंगात कमालीची चपळाई आहे. त्यामुळे त्याची पावले सुवर्णाचा वेध घेतात. त्याने कमी उंचीचा न्यूनगंड न बाळगता अनेकाने मागे टाकीत पदकावर नाव कोरण्याची किमया केली. आता त्याला राष्ट्रीय स्पर्धा खुणावत आहे. काम करुन शिक्षण
■ बेलवंडी येथील अनिल पवार या खेळाडूकडे एस.टी.च्या पासला पैसे नसतात. सुट्टीत काम करून पैसे कमवितो आणि कमविलेल्या पैशातून शिक्षण करीत अनिल पवारची धेय्याकडे वाटचाल सुरु आहे. राहुल जाधव विठ्ठल पवार सचिन जाधव स्वप्नील गव्हाणे

Web Title: Gold of Shrigodudi soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.