स्वस्तात सोन्याच्या आमिषाने दहा लाखाला फसविले
By Admin | Updated: January 12, 2015 13:44 IST2015-01-12T13:40:56+5:302015-01-12T13:44:28+5:30
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून अनोळखी पाच ते सात आरोपींनी १0 लाख ५३ हजार रुपयांची रक्कम लांबविल्याची घटना नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे परिसरात रविवारी सकाळी घडली.

स्वस्तात सोन्याच्या आमिषाने दहा लाखाला फसविले
सोनई(अहमदनगर) : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून अनोळखी पाच ते सात आरोपींनी १0 लाख ५३ हजार रुपयांची रक्कम लांबविल्याची घटना नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे परिसरात रविवारी सकाळी घडली.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, अविनाश बाबुलाल, बच्छाव (वय ३८, रा.चौगाव, ता. सटाणा, जि. नाशिक) यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महालक्ष्मी हिवरे (ता.नेवासा) शिवारात ११ जानेवारी रोजी सकाळी ७-३0 ते ८-३0 वाजण्याचे दरम्यान अनोळखी ५ ते ७ जणांनी स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून १0 लाख २७ हजार रुपये रोख, २५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन असा १0 लाख ५३ हजाराचा ऐवज फसवणूक करून लांबविला. सोनई पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. सहाय्यक निरीक्षक अनिल बेहराणी पुढील तपास करीत आहेत. अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. (वार्ताहर)