बहाणा करून चोरले सोन्याचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:35 IST2021-02-18T04:35:29+5:302021-02-18T04:35:29+5:30

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सुनीता भिकाजी नेहे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा ...

Gold jewelry stolen under the pretext | बहाणा करून चोरले सोन्याचे दागिने

बहाणा करून चोरले सोन्याचे दागिने

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सुनीता भिकाजी नेहे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. नेहे या मालदाड रस्त्यावरील स्वामी समर्थ नगरमध्ये राहतात. त्यांच्याकडे आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने सोन्याचे दागिने व भांडी स्वच्छ करून देतो. असे त्यांना सांगितले. घरातील सोन्याचे दागिने व भांडी त्यांनी त्या व्यक्तीकडे आणून दिली. काही वेळाने ही व्यक्ती ४ हजार ५०० रूपये किमतीचे गंठण व एक तोळा वजनाची सोन्याची साखळी असा मुद्देमाल घेऊन निघून गेली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नेहे यांनी शहर पोलीस ठाणे गाठत घडल्या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले या अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Gold jewelry stolen under the pretext