गोकुळचंदजी ठोळे यांची १४५ वी जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:44 IST2021-09-02T04:44:51+5:302021-09-02T04:44:51+5:30

कोपरगाव : शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे संस्थापक स्व. गोकुळचंदजी ठोळे यांची १४५ वी जयंती विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात ...

Gokulchandji Thole's 145th birth anniversary in excitement | गोकुळचंदजी ठोळे यांची १४५ वी जयंती उत्साहात

गोकुळचंदजी ठोळे यांची १४५ वी जयंती उत्साहात

कोपरगाव : शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे संस्थापक स्व. गोकुळचंदजी ठोळे यांची १४५ वी जयंती विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रमुख विजय नरोडे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून साईबाबा सुपर स्पेशालिटीचे हॉस्पिटलचे तज्ज्ञ कार्डिओलॉजिस्ट संदीप देवरे होते. मान्यवरांच्या हस्ते स्व. गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पर्यवेक्षक आर. बी. गायकवाड यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी करुन दिला. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक रवी पाटील यांनी स्व. ठोळे यांच्या कार्याचा आलेख स्पष्ट केला. माजी निवृत्त मुख्याध्यापक आर. डी. गवळी, माजी उपमुख्याध्यापक डी. एम. कांबळे, माजी पर्यवेक्षक एस. ए. इनामदार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे अध्यक्ष चंद्रकांत ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला सहसचिव सचिन अजमेरे, डॉ. अमोल अजमेरे, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीना पाटणी उपस्थित होते. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन एस. ए. अजमेरे यांनी केले. तर आभार एस. डी. गोरे यांनी मानले.

Web Title: Gokulchandji Thole's 145th birth anniversary in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.