गोडाऊन फोडून प्लंबिंग मटेरियल चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:14 IST2021-03-29T04:14:03+5:302021-03-29T04:14:03+5:30

...... प्रवाशाने चोरला मोबाईल अहमदनगर : फोन करण्याच्या बहाण्याने कारमालकाचा मोबाईल घेऊन चोरटा पसार झाला. शहरातील चितळे रोडवरील नेहरू ...

The godown was broken and the plumbing material was stolen | गोडाऊन फोडून प्लंबिंग मटेरियल चोरले

गोडाऊन फोडून प्लंबिंग मटेरियल चोरले

......

प्रवाशाने चोरला मोबाईल

अहमदनगर : फोन करण्याच्या बहाण्याने कारमालकाचा मोबाईल घेऊन चोरटा पसार झाला. शहरातील चितळे रोडवरील नेहरू मार्केटजवळ २७ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सुनील माधव कापसे (वय २५) याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर चोरटा कापसे यांच्या वाहनात प्रवासी म्हणून बसला होता. याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल काळे हे पुढील तपास करत आहेत.

........

चोरट्यांनी दोन गाया चोरल्या

अहमदनगर: नगर तालुक्यातील नेप्ती परिसरातून चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीच्या दोन जर्सी गायी चोरून नेल्या. २६ ते २७ मार्चदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात शेखर दत्तू मांहडुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक मरकड हे पुढील तपास करत आहेत.

..........

भाजी मार्केटमधून मोबाईल चोरला

अहमदनगर: नवनागापूर येथील सह्याद्री चौकातील भाजी मार्केट येथून चोरट्याने तरुणाचा मोबाईल चोरून नेला. २० मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनिल विठ्ठल चांदने यांनी २७ मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा हेड कॉन्स्टेबल सय्यद हे तपास करत आहेत.

............

Web Title: The godown was broken and the plumbing material was stolen