गोडाऊन फोडून साडेतीन लाखांचे खत चोरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 18:31 IST2019-01-09T18:30:34+5:302019-01-09T18:31:06+5:30
केडगाव येथील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात असलेल्या गोडावूनचे शटर तोडून चोरट्यांनी ३ लाख ३४ हजार ७३४ हजार रूपयांचे खत चोरून नेले़

गोडाऊन फोडून साडेतीन लाखांचे खत चोरले
अहमदनगर : केडगाव येथील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात असलेल्या गोडावूनचे शटर तोडून चोरट्यांनी ३ लाख ३४ हजार ७३४ हजार रूपयांचे खत चोरून नेले़ ५ ते ७ जानेवारीदरम्यान ही घटना घडली़ याप्रकरणी गुरूविंदसिंग गुरूबच्चन यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़
वाही यांचा वाहतुकीचा व्यवसाय आहे़ रेल्वेस्टेशन येथे येणाऱ्या खताची ते वाहतूक करतात़ हे खत ठेवण्यासाठी केडगाव व इतर ठिकाणी त्यांनी गोडावून उभारले आहेत़ त्यांनी येथील गोडावूनमध्ये खताच्या गोण्या ठेवल्या होत्या़ चोरट्यांनी गोडावूनचे शटर उचकटून खताच्या गोण्या चोरून नेल्या़