गोदड महाराज केसरी किताब संतोष गायकवाडने पटकावला
By Admin | Updated: May 24, 2016 23:42 IST2016-05-24T23:25:07+5:302016-05-24T23:42:11+5:30
कर्जत : सोलापूरच्या संतोष गायकवाडने कोल्हापूरच्या बबलू दणके याला चितपट करत गोदड महाराज केसरी किताब पटकावला. त्याला एक लाख रुपये रोख व चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले.

गोदड महाराज केसरी किताब संतोष गायकवाडने पटकावला
कर्जत : सोलापूरच्या संतोष गायकवाडने कोल्हापूरच्या बबलू दणके याला चितपट करत गोदड महाराज केसरी किताब पटकावला. त्याला एक लाख रुपये रोख व चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले.
कर्जत तालुका तालीम संघ, प्रवीण घुले मित्रमंडळ व अमरसिंह लाल आखाडा यांच्यासंयुक्त विद्यमाने कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री सुरेश धस यांच्या हस्ते झाले.
मानाची कुस्ती सोलापूरचा संतोष गायकवाड व कोल्हापूरचा बबलू दणके यांच्यात झाली. यामध्ये संतोष गायकवाडने बबलू दणकेला गिसा डावावर चितपट केले व अजिंक्यपद पटकावले.
संतोष गायकवाड याला एक लाख रुपये रोख व गोदड महाराज केसरीची मानाची गदा देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धा सात तास चालल्या.
दरम्यान, यामध्ये भारत मदणे, समाधान घोडके, गोकुळ आवारे, माउली जमदाडे, विक्रम शेटे, गणेश शेळके, किरण नलवडे, बाळू पुजारी यांनी प्रेक्षणीय कुस्त्या केल्या.
पंच म्हणून विक्रम धांडे, विजय मोढळे, शाम कानगुडे, भाऊसाहेब पोटरे, बापू शेळके यांनी काम पाहिले. स्पर्धेत पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, बीड, अकलूज, दौंड येथून मल्ल आले होते.
स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजक प्रवीण घुले, नगरसेवक सचिन घुले, सुदाम धांडे, विजय मोरे आदींनी परिश्रम घेतले. या कुस्ती स्पर्धेचे नामवंत सूत्रसंचालक शंकर पुजारी, प्रशांत भागवत यांनी सूत्रसंचालन केले.
(तालुका प्रतिनिधी)