२०२० चे आॅलिपिंक जिंकणे हेच ध्येय
By Admin | Updated: November 3, 2016 01:00 IST2016-11-03T00:37:54+5:302016-11-03T01:00:54+5:30
श्रीगोंदा : सन २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या आॅलिपिंक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे हेच मुख्य ध्येय आहे. त्यासाठी मैदानात उतरणार आहे.

२०२० चे आॅलिपिंक जिंकणे हेच ध्येय
श्रीगोंदा : सन २०२० मध्ये टोकियो येथे होणाऱ्या आॅलिपिंक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे हेच मुख्य ध्येय आहे. त्यासाठी मैदानात उतरणार आहे. देशाचा सन्मान जगभर उंचावण्यासाठी माझ्या प्रयत्नांना आई-वडिलांनी बळ दिल्याची भावना आंतराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर हिने व्यक्त केली.
लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथे बुधवारी ‘अग्निपंख फाउंडेशन’ या संस्थेने आयोजित २६ आदर्श मातांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ती बोलत होती. राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी ललिता बाबर हिला डॉ. ए. पी. जी. अब्दुल कलाम खेलरत्न पुरस्कार व ५१ हजार रोख ‘अग्निपंख’च्या वतीने पालमंत्री राम शिंदे यांनी प्रदान केले. खडतर स्थितीत व परिस्थितीला हरवत जिद्दीने आपल्या पाल्यांना यशाचे शिखर दाखविणाऱ्या राज्यातील २६ महिलांचा ‘डॉ. कलाम आदर्श माताह्ण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना ललिता बाबर म्हणाली, यशापयश खेळाचा भाग आहे. आई, वडील तसेच चुलत्यांनी पाठबळ दिल्यामुळेच मी आव्हानांवर मात करीत रिओच्या फायनलपर्यंत धडक मारली. २०२० चे आॅलिपिंक जिंकणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू आहे. ग्रामीण भागातील मुली पुढे जात आहेत. देशाचे नाव उंचविण्यात मुली अग्रेसर आहेत. मुलान्ांीही कठोर परिश्रमाची तयारी करावी. न्यूनगंड दूर करून अपार मेहनत केल्यास यश दूर नाही. मुलगा-मुलगी भेद आता कालबाह्य ठरत आहे, हे सुचिन्ह म्हणावे लागेल. पालकमंत्री शिंदे म्हणाले, जीवनात उच्चपदी पोहचणाऱ्या पाल्यांच्या यशात माता-पितांचे खरे श्रेय आहे. अशा प्रेरणादायी मातांचा सन्मान करून मी खरोखर कृतार्थ झालो आहे. संघर्ष हे जीवनाचे दुसरे नाव आहे. यश हे आपसूक मिळत नसते. प्रयत्नांना प्रेरणेचे बळ असावे लागते, ते आईकडून मिळते. ललिता बाबर हिचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येक आई-बाबांनी आपल्या पाल्यास उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ‘अग्निपंखह्ण संस्थेने कर्तृत्वान मातांना सन्मानित केल्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजे.
शिवाजीराव नागवडे म्हणाले, चांगुलपणाला दाद देणारा हा कार्यक्रम आहे. ज्यांचा सन्मान झाला, त्यांच्यामुळे अन्य पालकांनाही ऊर्जा मिळेल. ललिता बाबरसारखे धावपटू देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी पराकाष्टा करीत आहेत. तिच्या प्रयत्नांना आपण दाद दिली पाहिजे.
‘अग्निपंख’चे अध्यक्ष बाळासाहेब काकडे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. पुढील वर्षी १५ युवा शेतकऱ्यांचा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. समाधान महाराज शर्मा यांनी ‘आई’वरील दीर्घकाव्य ऐकविले.
पालकमंत्री शिंदे यांना चित्रकार सुनील शिंदे यांनी आईचे रेखाचित्र भेट दिले. कार्यक्रमास माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार दगडू बडे, जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रेय पानसरे, सभापती अर्चना पानसरे, माजी सभापती बाळासाहेब गिरमकर, भगवानराव पाचपुते, नगरसेवक भरत नाहाटा मच्छिंद्र सुपेकर , केशव मगर, राजेंद्र म्हस्के, अतुल लोखंडे, सचिन कातोरे, ‘अग्निपंख’चे दिलीप काटे, सुरेखा शेंद्रे, प्रा. संजय लाकूडझोडे, शिवदास शिंदे, अॅड. दिलीप रोडे, शुभांगी लगड तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)