सुरेश पाथरकर यांना ग्लोबल टीचर्स पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:18 IST2021-01-04T04:18:31+5:302021-01-04T04:18:31+5:30

करंजी : पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथील रहिवासी व पाली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शेठ ज. नौ. पालीवाला कॉमर्स, आर्ट, ...

Global Teachers Award to Suresh Patharkar | सुरेश पाथरकर यांना ग्लोबल टीचर्स पुरस्कार

सुरेश पाथरकर यांना ग्लोबल टीचर्स पुरस्कार

करंजी : पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथील रहिवासी व पाली येथील सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शेठ ज. नौ. पालीवाला कॉमर्स, आर्ट, सायन्स महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुरेश पाथरकर यांना ग्लोबल टीचर्स पुरस्कार जाहीर झाला आहे.

नवी दिल्ली येथील ए. के. एस. फाऊंडेशनने ऑनलाईन पद्धतीने जगभरातून या पुरस्कारासाठी जुलै महिन्यात अर्ज मागविले होते. ११० देशांतून ३ हजार अर्ज आले होते. त्यातील ५०० जणांची निवड करण्यात आली होती. महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुरेश विठ्ठलराव पाथरकर यांना त्यांच्या शैक्षणिक व संशोधन विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. प्रा. सुरेश पाथरकर हे चिचोंडीचे वृत्तपत्र विक्रेते रमेश पाथरकर यांचे बंधू आहेत. यशाबद्दल त्यांचे प्रा. मुळे, शिवाजी घोरपडे, अनिल पोटे, प्रा. संजय उदमले, प्रा. ईश्वर ढोले आदींनी कौतुक केले.

फोटो ०३ सुरेश पाथरकर

Web Title: Global Teachers Award to Suresh Patharkar