भातोडी बंधाऱ्यातील पाणी शेजारच्या गावांना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:26 IST2021-09-09T04:26:03+5:302021-09-09T04:26:03+5:30
केडगाव : भातोडी (ता. नगर) येथील बंधाऱ्यातून सांडव्यातून जाणारे पाणी परिसरातील गावांना देण्यात यावे याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद ...

भातोडी बंधाऱ्यातील पाणी शेजारच्या गावांना द्या
केडगाव : भातोडी (ता. नगर) येथील बंधाऱ्यातून सांडव्यातून जाणारे पाणी परिसरातील गावांना देण्यात यावे याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता बी. एस. वाळके यांना दिले.
भातोडी परिसरात झालेल्या पावसामुळे बंधारा पूर्ण क्षमतेने भरला. बंधाऱ्यातील सांडव्यातून पाणी वाहून जात आहे. हे वाहून जाणारे पाणी कॅनॉलद्वारे सांडवा, मांडवा व दशमी गव्हाण येथील तलावात टाकून तलाव भरुन घेण्यात यावेत. याठिकाणी कॅनॉलची सुविधा उपलब्ध आहे. ज्या भागात टँकर चालू आहेत हे पाणी त्या गावांना दिल्यास टँकर बंद होऊन शासनाचा पैसाही वाचणार आहे. तरी वरीलप्रमाणे कार्यवाही केल्यास तेथील तलाव पूर्ण भरतील व शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिवाजी लगड, अजय बोरुडे, संतोष काळे, ज्ञानदेव लगड, उद्धव कांबळे, बाबा काळे, बाळासाहेब खांदवे, रमेश खांदवे, बुऱ्हाण शेख, अमोल निक्रड आदी उपस्थित होते.