वाघवाडी ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी जागा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:56 IST2021-02-20T04:56:35+5:302021-02-20T04:56:35+5:30

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर अंतर्गत येणाऱ्या वाघवाडी गावाला स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्मशानभूमीसाठी ...

Give space for cremation ground to Waghwadi villagers | वाघवाडी ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी जागा द्या

वाघवाडी ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी जागा द्या

केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर अंतर्गत येणाऱ्या वाघवाडी गावाला स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तू डोकडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना देण्यात आले होते. वाघवाडी येथे ८०० ते ९०० लोकसंख्या असून येथे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीच नसल्याने अंत्यविधी करायचा कोठे हा मोठा प्रश्न वाघवाडी ग्रामस्थांना भेडसावत आहे. अनेक वर्षांपासून स्मशानभूमीच्या जागेची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत खाजगी व्यक्तीच्या मालकीच्या जागेत अंत्यविधीचे कार्यक्रम पार पडत आहेत. तरी भविष्यात येथे स्मशानभूमी अभावी मोठा पेचप्रसंग उभा राहणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून वाघवाडी ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तू डोकडे व ग्रामस्थांनी राज्यमंत्री तनपुरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याच मागणीचे निवेदन उपवनसंरक्षक यांनाही देण्यात आले आहे.

Web Title: Give space for cremation ground to Waghwadi villagers