२० टक्के अनुदानित शिक्षकांना शालार्थ आयडी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST2021-04-29T04:16:07+5:302021-04-29T04:16:07+5:30
अहमदनगर : राज्यातील अनेक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना गेल्या १५ ते २० वर्षांपासून विनावेतन ...

२० टक्के अनुदानित शिक्षकांना शालार्थ आयडी द्या
अहमदनगर : राज्यातील अनेक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना गेल्या १५ ते २० वर्षांपासून विनावेतन काम करावे लागले. शासनाने त्यांना २० टक्के पगार मंजूर केला पण तो शालार्थ आय.डी. नसल्याने नियमित होत नाही. त्यामुळे त्वरित शालार्थ आय.डी. देऊन त्यांचा पगार नियमित व्हावा, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे ज्युनिअर कॉलेज युनियनचे सरचिटणीस प्रा. महेश पाडेकर यांनी उपसंचालयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नाशिक विभागात शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून २० टक्के अनुदान मंजूर झालेल्या शिक्षकांची ऑनलाइन माहिती मागवून शालार्थ आय.डी. देण्याचे कामकाज चालू आहे. परंतु पुणे विभागाने शासन आदेश असूनही अद्याप कुठल्याही प्रकारची कार्यवाही सुरू केलेली नाही. ऑफलाइन बिल वेतन पथक यांच्याकडे देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. त्यामुळे कोविड१९च्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेले सर्व नियमांचे पालन करून पुणे विभागात जिल्हानिहाय कार्यशाळेचे आयोजन करावे, अशी विनंती शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, जुनियर कॉलेज युनिटचे सरचिटणीस महेश पाडेकर जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरू, कार्याध्यक्ष डॉ. किशोर डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन जासूद, तालुकाध्यक्ष संजय तमनर, शाम जगताप, रोहिदास चव्हाण, प्रवीण मते, हर्षल खंडीझोड, सचिन लगड, विनाअनुदान विरोधी संघर्ष समितीचे दिनेश शेळके, रूपाली कुरुंमकर, महिला अध्यक्षा आशा मगर, माध्यमिक विभागाचे सचिव विजय कराळे, उर्दू विभाग जिल्हाध्यक्ष मोहम्मद सामी शेख, संभाजी पवार, तालुकाध्यक्ष रोहिदास चव्हाण, बाबासाहेब लोंढे, सुदाम दिघे, हनुमंत रायकर, संभाजी पवार, कैलास जाधव, नवनाथ घोरपडे, किसन सोनवणे, सिकंदर शेख, अशोक अन्हाट, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, सूर्यकांत बांदल, जॉन सोनवणे, बाळासाहेब शिंदे आदींनी केली आहे.