कोरोनामुळे निधन झालेल्यांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST2021-04-29T04:16:31+5:302021-04-29T04:16:31+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या महामारीत निधन झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना शासनाने दोन लाखांची मदत जाहीर करावी, अशी मागणी रुद्र अपंग संघटनेच्या ...

कोरोनामुळे निधन झालेल्यांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत द्या
अहमदनगर : कोरोनाच्या महामारीत निधन झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना शासनाने दोन लाखांची मदत जाहीर करावी, अशी मागणी रुद्र अपंग संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून जनजीवन विस्कळीत झाले आहे. बऱ्याच कुटुंबातील सदस्यांना या महामारीमुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये बहुतांश लोक कुटुंबातील कर्ते होते. अनेकांना उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागले आहेत. एवढे करूनही अनेक लोकांचे जीव गेले. शासन आपल्या स्तरावर चांगले काम करत आहे. परंतु तरीही कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावत आहेत. अशातच लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. कुटुंबातील व्यक्ती गेल्याने अनेक कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे. शिवाय अनेकांचा दवाखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च झाला. एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाले तर शासन मदत करते. त्याच धर्तीवर कोरोनाला नैसर्गिक आपत्ती समजून यामुळे मृत झालेल्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर करावी, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे यांनी निवेदनात केली आहे.