ओबीसींना धक्का न लावता इतरांना आरक्षण द्या

By Admin | Updated: September 28, 2016 00:04 IST2016-09-28T00:04:17+5:302016-09-28T00:04:17+5:30

अहमदनगर : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर समाजाला आरक्षण द्यावे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसींचा कोणताही विरोध नाही,

Give reservation to OBCs without affecting others | ओबीसींना धक्का न लावता इतरांना आरक्षण द्या

ओबीसींना धक्का न लावता इतरांना आरक्षण द्या


अहमदनगर : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर समाजाला आरक्षण द्यावे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसींचा कोणताही विरोध नाही, मात्र त्यांना दिले जाणारे आरक्षण स्वतंत्रपणे द्यावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. याबाबत समस्त ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी निर्धार केला असून नाशिक येथे ३ आॅक्टोबरला होणाऱ्या मोर्चासाठी जिल्ह्यातून एक लाख लोक जाणार आहेत.
ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी नगर येथील नंदनवन लॉनमध्ये बैठक घेतली. या बैठकीला ओबीसी संघटना, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये नेमक्या मागण्या कोणत्या आहेत, त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर समाजाला आरक्षण द्यावे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसींचा अजिबात विरोध नाही, मात्र त्यांना दिले जाणारे आरक्षण स्वतंत्रपणे द्यावे. मराठा समाजाचे आरक्षण ओबीसींच्या आरक्षणात समाविष्ट करू नये. ओबीसींची जनगणना जाहीर करण्यात यावी. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर राजकीय सूडबुद्धिने कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई त्वरित थांबवावी.
मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा पाठिंबा असल्याचेही या बैठकीत जाहीर करण्यात आले. भुजबळ यांच्यावरील कारवाईचा या बैठकीत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. ‘एक पर्व-ओबीसी सर्व’असे घोषवाक्य तयार करण्यात आले आहे. नाशिक येथे ३ आॅक्टोबरला ओबीसींचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये नगर जिल्ह्यामधून एक लाख लोक जाणार आहेत. त्यासाठी गावोगावी प्रचार करण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीला ओबीसींमधील विविध जातीमधील दोन हजार कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीला शरद झोडगे, संभाजी पालवे, भीमराज आव्हाड, बाबा गाडळकर, दत्ता जाधव, संजय बुधवंत, बाळासाहेब बोराटे, अंबादास गारुडकर, दिगंबर ढवण, निवृत्ती दातीर, अजय औसरकर, शांताराम राऊत, दीपक सूळ, संजय गारुडकर, अशोक दहिफळे, सारंग पंधाडे, नामदेव पवार, संजय लोंढे, सचिन गुलदगड, हरिभाऊ डोळसे, नगरसेवक अनिल बोरुडे, अशोक सोनवणे, नगरसेविका विणा बोज्जा, सुवर्णा जाधव, विष्णू फुलसौंदर, गोरख पडोळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Give reservation to OBCs without affecting others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.