कोल्हे कारखान्याचे संचालक अरुणराव येवले, अशोक औताडे, ॲड. राहुल रोहमारे, सरपंच योगिराज देशमुख, राजेंद्र डुबे, राजेंद्र औताडे, रमेश औताडे, प्रमोद आभाळे, कृष्णा शिलेदार, राजेंद्र गवळी, अशोक होन, नरहरी रोहमारे, सरपंच सुनील भागवत, देवेंद्र रोहमारे, शरद गवळी, गणेश शिलेदार, कैलास डुबे, भाऊसाहेब डुबे, विठ्ठल कोल्हे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या वतीने कनिष्ठ अभियंता प्रशांत बोंडखळ यांना लेखी निवेदन देण्यात आले.
शेतात उभी असलेली पिके केवळ विजेअभावी जळून जात असल्याची तक्रार यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. शेती पंपाचा वीजपुरवठा केव्हा सुरळीत होईल. चांदेकसारे येथे सबस्टेशन मंजूर होते. जागा उपलब्ध असतानादेखील त्या सबस्टेशनचे काम झाले नाही. ही सर्वस्वी वीज वितरण कंपनीची हयगय झाली आहे. ॲड. राहुल रोहमारे म्हणाले की, देर्डे-कोऱ्हाळे, देर्डे चांदवड, मढी खुर्द, मढी बुद्रुक, कोळगाव पाटी, घारी हिंगववेढे परिसरातील सर्व शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे तातडीने वीजपुरवठा सुरळीत करा.