पंकजा मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद द्या
By Admin | Updated: June 10, 2014 00:13 IST2014-06-09T23:30:07+5:302014-06-10T00:13:54+5:30
शेवगाव : लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. भाजपाचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले
पंकजा मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद द्या
शेवगाव : लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. भाजपाचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले असून नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांचे नेतृत्व सक्षम असून त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते अॅड. शिवाजीराव काकडे व महिला बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदाताई काकडे यांनी केली आहे.
परळी येथे दिवंगत मुंडे यांच्या कन्या पंकजाताई मुंडे यांची अॅड. काकडे व हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडे यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळात समावेशाची मागणी काकडे यांनी केली.
गोपीनाथ मुंडे यांनी समाजातील विविध घटकांचे उत्तम संघटन केले होते. समाजातील सर्व स्तरातील लोकांची त्यांना मोठी साथ होती. विविध घटकाचे नेतृत्व करण्याची क्षमता पंकजा मुंडे यांच्यामध्ये आहे़ मंत्रीमंडळात त्यांना संधी दिल्यास त्याचा फार मोठा फायदा भाजपाला तसेच गोरगरीब जनेतला मिळू शकेल. सर्व जाती धर्मातील लोक पंकजातार्इंच्या पाठीमागे उभी राहू शकतात. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्यास मोठी मदत होईल, असा युक्तीवाद अॅड. काकडे यांनी यावेळी केला़
(तालुका प्रतिनिधी)