मराठी चित्रपटांना ‘सैराट’ प्रेम द्या

By Admin | Updated: June 27, 2016 01:00 IST2016-06-27T00:52:59+5:302016-06-27T01:00:38+5:30

अहमदनगर : मराठी माणूस प्रत्येक हिंदी चित्रपट पाहतो. मात्र आता मराठी माणसांनी प्रत्येक मराठी चित्रपट पाहिला पाहिजे. मराठी माणसाने

Give love to Marathi films 'Sairat' | मराठी चित्रपटांना ‘सैराट’ प्रेम द्या

मराठी चित्रपटांना ‘सैराट’ प्रेम द्या


अहमदनगर : मराठी माणूस प्रत्येक हिंदी चित्रपट पाहतो. मात्र आता मराठी माणसांनी प्रत्येक मराठी चित्रपट पाहिला पाहिजे. मराठी माणसाने ‘सैराट’ चित्रपटाला उदंड प्रेम दिले. तसेच प्रेम प्रत्येक मराठी चित्रपटाला दिले पाहिजे, असे आवाहन मराठी सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
नगर तालुक्यातील देहरे येथे रविवारी एका संस्थेच्या कार्यक्रमासाठी कुलकर्णी आल्या होत्या. त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती.
सोनाली यांनी व्यासपीठावर येताच हात वर करून उपस्थितांना अभिवादन केले. व्यासपीठावर येताच टाळ््या, शिट्यांनी सोनालीचे जोरदार स्वागत झाले. फटाक्यांच्या आतषबाजीने झालेल्या स्वागताने त्या भारावल्या. मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. प्रत्येकाने प्रत्येक मराठी चित्रपट पाहिला पाहिजे. माझाही एक नवा मराठी चित्रपट लवकरच येत आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद द्या, अशी सादही सोनाली यांनी चाहत्यांना घातली. सोनालीला पाहण्यासाठी तरुणांचीही मोठी गर्दी होती. सोनाली यांचे भाषण तरुणांनी कान टवकारून ऐकले आणि टाळ्यांनी दादही दिली.
(प्रतिनिधी)

Web Title: Give love to Marathi films 'Sairat'