शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

रोहित पवार यांनाच उमेदवारी द्या : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 11:33 IST

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून बारामती अ‍ॅग्रोचे अध्यक्ष रोहित पवार यांनाच उमेदवारी द्या, अशी मागणी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली.

कर्जत : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून बारामती अ‍ॅग्रोचे अध्यक्ष रोहित पवार यांनाच उमेदवारी द्या, अशी मागणी कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.९) राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून रोहित पवार व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड हे दोनच उमेदवार इच्छुक आहेत. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसकडे आहे. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा यासाठी पक्षाच्या वतीने प्रयत्न केले जातील. मतदारसंघातील विविध प्रश्न व सक्षम विरोधकाचा विचार करता रोहित पवार यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार हेच असतील हे निश्चित झाले आहे.हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तर रोहित पवार किंवा मंजुषा गुंड यापैकी ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करायचा, असेही यावेळी ठरले. या जागेबाबत राज्य पातळीवरील नेते जो निर्णय घेतील तो मान्य करण्यात येईल, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. यावेळी रोहित पवार, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांनी मार्गदर्शन केले.या बैठकीला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, मनिषा जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश काळे, जिल्हा उपाध्यक्ष विजय मोढळे, उद्योजक दीपक शिंदे, अ‍ॅड. सुरेश शिंदे, कर्जत तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सपकाळ, थेरवडीचे सरपंच वसंत कांबळे, जळकेवाडीचे सरपंच किरण पावणे, शिवाजीराव फाळके, माजी सभापती एकनाथ गांगर्डे, देविदास गोडसे, मारूती सायकर, बहिरोबावाडीचे उपसरपंच सचिन लाळगे, सचिन मांडगे, मधुकर घालमे, चमस थोरात आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसKarjatकर्जतJamkhedजामखेड