सज्ञान मुलगी अल्पवयीन असताना तिच्यावर अत्याचार
By शेखर पानसरे | Updated: February 18, 2024 20:32 IST2024-02-18T20:31:51+5:302024-02-18T20:32:17+5:30
फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सज्ञान मुलगी अल्पवयीन असताना तिच्यावर अत्याचार
घारगाव : सज्ञान मुलगी अल्पवयीन असताना दोन वर्षांपूर्वी तिच्यावर २३ वर्षीय मुलाने अत्याचार केले होते. जानेवारी २०२२ चे पहिल्या आठवड्यात ही घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील एका गावात घडली होती. या प्रकरणी पिडित मुलीने शुक्रवारी (दि.१६) घारगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत नवनाथ भुजबळ (वय २३, रा. साकूर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या मुलाचे नाव आहे. सध्या पिडित मुलीचे वय १८ वर्ष आणि १ महिने पूर्ण आहे. जानेवारी २०२२ चे पहिल्या आठवड्यात पिडित मुलगी कनिष्ठ महाविद्यालयातून घरी येत होती. त्यावेळी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अनिकेत भुजबळ याने तिला दमदाटी केली, तो तिला जवळच असलेल्या उसामध्ये ओढत घेऊन गेला. पिडित मुलीवर त्याने शारीरिक अत्याचार केले होते. घारगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.