शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

लग्नात सॅनिटरी नॅपकिनची भेट; काळेवाडीत अनोखा विवाह सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 11:05 IST

पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या काळेवाडी वस्तीवर बीड जिल्ह्यातील भारत गडदे आणि प्रतीक्षा पाताळे या दोघांचा शुक्रवारी विवाह झाला

अहमदनगर: लग्नात रुखवत, वरमार्इंचे भोजन, सुनमूख पाहणे हे महिलांच्या आकर्षणाचे विषय असतात. पण, काळेवाडीत झालेल्या विवाह सोहळ्यात व-हाडी महिलांना वेगळीच भेट मिळाली. महिलांना सॅनिटरी नॅपकिन भेट देण्यात आले. लग्नात आशीर्वादाची भाषणेही नव्हती. त्याऐवजी मासिक पाळीत महिलांनी काय काळजी घ्यावी? ही भाषणे होती. पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या काळेवाडी वस्तीवर बीड जिल्ह्यातील भारत गडदे आणि प्रतीक्षा पाताळे या दोघांचा शुक्रवारी विवाह झाला. दोघांचेही आईवडील शेतकरी. या दुर्गम वस्तीवर बहुतांश धनगर कुटुंब राहतात. भारत हा युवा चेतना फाउंडेशन या संघटनेचा सदस्य आहे. या संघटनेतील युवकांनी आजवर अशाच आगळ्या प्रथा लग्नात रुढ केल्या आहेत. एका लग्नात पुस्तकांचा रुखवत होता. एका लग्नात साफसफाई मोहीम राबविण्यात आली. एका लग्नात वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला. भारतच्या लग्नात सॅनिटरी पॅडचे वाटप करुन महिलांचे मासिक पाळीत घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करावयाचे ठरले. त्यानुसार अमर कळमकर, योगेश काकडे, प्रियदर्शनी पोळ, प्रकाश मानव, अशोक चिंधे, शुभम गोडसे, पूजा केरकळ, राणी कळमकर, ग्यानेश्वर आघाव, डॉ. पूजा आहिर, गणेश ठोंबरे या कार्यकर्त्यांनी लग्नाच्या अगोदर वधू-वरांच्या आईवडिलांची मानसिक तयारी केली. त्यानंतर दोन दिवस अगोदर गावात जाऊन गावक-यांना व महिलांना विश्वासात घेतले. तोवर ब-याच महिलांना सॅनिटरी पॅड म्हणजे काय? हे माहिती नव्हते. हे पॅड भेटवस्तूच्या स्वरुपात बंदिस्त करुन लग्नमंडपात वाटण्यात आले. पुण्यातील समाजबंध संस्थेचे कार्यकर्ते सचिन आशा सुभाष यांनी मार्गदर्शन करताना ‘यापुढे बाजारला गेल्यावर पत्नी, आई, बहिणीसाठी सॅनिटरी पॅड विकत आणत जा,’ असे आवाहन पुरुषांना केले. स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी, ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, अ‍ॅड. शाम असावा यांची सोहळ्यास  उपस्थिती होती. आशा सेविका सुरेखा काळे, सरपंच अजित देवढे, अंगणवाडी सेविका यांनीही उपक्रमासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमामुळे महिलांचे मासिक पाळीबाबत प्रबोधन झाल्याचे सुरेखा काळे म्हणाल्या. लग्नात राबविलेला उपक्रम व गावाने दिलेली साथ कौतुकास्पद असल्याचं मत स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

व्हेंडिंग मशिनचा आहेरपैसे टाकल्यावर सॅनिटरी पॅड मिळेल असे व्हेंडिंग मशिनही लग्न समारंभात गावाला भेट देण्यात आले. यावेळी टेंड्रिल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आरती शर्मा यांनीही महिलांना मासिक पाळी व सॅनिटरी पॅडबाबत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे महिला, पुरुषांनी न लाजता हे सर्व मार्गदर्शन आनंदाने ऐकले.   

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर