या बैठकीत कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे म्हणाले, विसापूरचे जलसंपदा विभागामार्फत नियोजन करून सोडण्यात येणारे हे शेवटचे आवर्तन आहे. यापुढे खासगी संस्थेकडे आवर्तनाचे नियोजन जाणार आहे. मात्र जलसंपदा विभाग अकुंश ठेवणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. विसापूरखाली १७ पाणीवाटप संस्थांकडे २० लाखांची थकबाकी आहे ही बाकी भरणे आवश्यक आहे.
माजी उपसभापती गणपतराव काकडे म्हणाले, कालव्यावर मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होते. त्यावेळी एल वन चारीला पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही. खासगीकरण झाले तर पाणी वापर संस्था बरखास्त करून टाकू असा इशारा दिला. मात्र कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी काकडेंची समजून सांगितले.
यावेळी तहसीलदार प्रदीप पवार, कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, नगरसेवक संग्राम घोडके, झुंबर गायकवाड, संपत गायकवाड, निखिल क्षीरसागर, सावता वऱ्हाडे, उपअभियंता शंशीकांत माने, अविनाश फडतरे उपस्थित होते.
...
जनआंदोलन उभारणार
घोड, विसापूर, सीनाच्या लाभक्षेत्रात यावर्षी आडचण येणार नाही, परंतु कुकडी लाभक्षेत्रात डचण निर्माण होणार आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी डिंबे, माणिकडोह, जोड बोगद्याचे काम होणे आवश्यक आहे. शासनाने टोलवालवी चालविली आहे. या ज्वलंत प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच जनआंदोलन उभे करणार आहे, असा इशारा आमदार बबनराव पाचपुते यांनी यावेळी दिला.