घाटसिरसच्या जवानाचा चेन्नईत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 15:59 IST2019-06-14T15:59:29+5:302019-06-14T15:59:36+5:30
इंडो-तिबेट सीमा पोलीस दलातील जवान संभाजी गंगाधर पालवे (वय ३८) यांचा मंगळवारी चेन्नईत कामावर जात असताना अपघात होऊन मृत्यू झाला.

घाटसिरसच्या जवानाचा चेन्नईत मृत्यू
करंजी : इंडो-तिबेट सीमा पोलीस दलातील जवान संभाजी गंगाधर पालवे (वय ३८) यांचा मंगळवारी चेन्नईत कामावर जात असताना अपघात होऊन मृत्यू झाला. गुरूवारी त्यांच्या गावी घाटसिरस (ता. पाथर्डी) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी त्यांच्या पार्थिवासोबत आलेल्या इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाच्या पथकाने त्यांना अखेरची मानवंदना दिली.
गुरूवारी सकाळी तिबेट पोलिसांनी त्यांच्या खास वाहनातून पालवे यांचे पार्थिव घाटसिरस येथे आणले.
ग्रामस्थांनी सजविलेल्या रथातून अंत्ययात्रा काढली. अंत्यसंस्कारप्रसंगी ‘भारत माता की जय, संभाजी पालवे अमर रहे’ अशा घोषणांनी घाटसिरस परिसर दणाणून गेला
होता. याप्रसंगी उपसरपंच नवनाथ पाठक, दादासाहेब चोथे, राजेंद्र पालवे, लक्ष्मण पाठक, अनिल पाठक, त्यांचे बंधू शिवाजी पालवे तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.