जिलेटिनचा स्फोट; तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: June 4, 2024 18:55 IST2014-09-16T23:58:37+5:302024-06-04T18:55:35+5:30
राहाता : काकडी शिवारातील मल्हारवाडी शिवारात तोंडात जिलेटिनसदृश वस्तूचा स्फोट झाल्याने तरूण जागीच ठार झाला.

जिलेटिनचा स्फोट; तरुणाचा मृत्यू
राहाता : काकडी शिवारातील मल्हारवाडी शिवारात तोंडात जिलेटिनसदृश वस्तूचा स्फोट झाल्याने तरूण जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
भानुदास रानवडे यांच्या वस्तीजवळ सोमनाथ दगडू रानवडे (वय २५) हा तरुण मृतावस्थेत पडला असल्याची माहिती पोलीस पाटील बाबासाहेब गुंजाळ यांनी राहाता पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन प्रवरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जिलेटिनसदृश वस्तूचा तोंडात स्फोट झाल्याने या तरूणाचा चेहरा पूर्णपणे फाटलेला होता. हा अपघात की घातपात याबाबत उलटसुलट चर्चा परिसरात सुरू होती.