शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

गौतम हिरण यांची हत्या जुन्या कामगाराकडूनच; पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 07:27 IST

जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी शनिवारी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. काही वर्षांपूर्वी हिरण यांच्याकडे एक व्यक्ती व त्याचा मुलगा दोघेही कामाला होते. या मुलाने आपली गाडी बंद पडल्याच्या बहाण्याने हिरण यांची मदत मागितली.

श्रीरामपूर : संपूर्ण राज्यात गाजलेल्या बेलापूर येथील (जि. नगर) व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे उलगडले असून त्यांच्याकडील पैसे लुटून नंतर हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहेत. याप्रकरणी नाशिक व नगर जिल्ह्यातून पाच आरोपींना अटक केली आहे. हिरण यांच्या जुन्या कामगारानेच हा कट रचल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. (Gautam Hiran's murder by old worker; Five arrested)अटक केलेल्या आरोपींमध्ये संदीप मुरलीधर हांडे (२६, माळेगाव, जि. नाशिक), जुनेद ऊर्फ जावेद बाबू शेख (२५, रा. सिन्नर), अजय राजू चव्हाण (२६, सिन्नर), नवनाथ धोंडू निकम (२९, रा. उक्कडगाव, जि. नगर) व एका २२ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. आरोपींकडून हिरण यांचा मोबाइल फोन तसेच अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती व्हॅन जप्त करण्यात आली आहे.जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी शनिवारी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. काही वर्षांपूर्वी हिरण यांच्याकडे एक व्यक्ती व त्याचा मुलगा दोघेही कामाला होते. या मुलाने आपली गाडी बंद पडल्याच्या बहाण्याने हिरण यांची मदत मागितली. एका दुकानदाराकडून गाडी दुरुस्तीचे साहित्य घेऊन हिरण त्याच्यासोबत दुचाकीवर गेले. पुढे रस्त्यात असलेल्या अन्य साथीदारांच्या मदतीने त्याने हिरण यांच्याकडील १ लाख ६४ हजार रुपये लुटले. हिरण आपणाला ओळखतील या भीतीपोटी आरोपींनी त्यांची हत्या केली.

सकल जैन समाजाकडून तपासासाठी पाठपुरावा- हिरण यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांनी गृहमंत्र्यांकडे केली होती. - अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाने आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलनही केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधिमंडळात आवाज उठविला होता. - त्यामुळे तपासाची चक्रे वेगाने फिरली. आरोपींना अटक झाल्याने जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

असा झाला गुन्ह्याचा उलगडाअपहरण घडले त्यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी मारुती व्हॅनमधून संशयास्पदरीत्या एका व्यक्तीला नेताना पाहिले होते. त्यावरून पोलिसांनी व्हॅनचा शोध घेतला. ती नाशिक जिल्ह्यात मिळून आली. ती मूळ मालकाकडून एकाने चालविण्यास घेतली होती. या वाहनात हिरण यांच्या मोबाइलसह बँकेचे चेकबुक व पावत्या सापडल्या. गुन्हेगारांनी दहा ते पंधरा दिवस बेलापूर येथे रेकी केल्याचे तपासात समोर आले आहे. अपहरण केल्यानंतर पसार होण्याचे मार्ग शोधण्यात आले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगरPoliceपोलिस