दोन गावांमधील गौराईची लढाई बरोबरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 20:34 IST2017-08-22T20:29:15+5:302017-08-22T20:34:06+5:30
श्रावणी पोळ्याच्या दुसºया दिवशी रंगणारी शेंडी-पोखर्डी या दोन गावांमधील गौराईची वैशिष्ट्यपूर्ण लढाई बरोबरीत सुटली. मात्र महिलांच्या असणाºया या लढाईत पुरूषांची यावेळी मोठी लुडबुड वाढल्याने पोलिसांना बळाचा वापर करण्याची वेळ आली.

दोन गावांमधील गौराईची लढाई बरोबरीत
ठळक मुद्देआमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते पूजन
अहमदनगर :
दोन्ही गावातील महिलांनी आणलेल्या गौराईचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर जवळपास अर्धा तास लढाई चालली. पण यात पुरुषांचा हस्तक्षेप इतका वाढला की, पोलिसांना यात त्यांना मागे ओढावे लागले. पोलीस बंदोबस्त नसता तर राडा होण्याची चिन्हे दिसत होती.