शस्त्रांसह टोळी गजाआड
By Admin | Updated: June 9, 2016 23:39 IST2016-06-09T23:34:57+5:302016-06-09T23:39:02+5:30
अहमदनगर : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शस्त्रांसह दबा धरून बसलेल्या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गजाआड केले.

शस्त्रांसह टोळी गजाआड
अहमदनगर : दरोडा टाकण्याच्या उद्देशाने शस्त्रांसह दबा धरून बसलेल्या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गजाआड केले. या कारवाईत बुधवारी रात्री पाच जणांना अटक केली असून दोघेजण पळून गेले आहेत.
विळद बायपास रोडवरील चौकाजवळ तोंडाला कपडे बांधून सातजण हातात दांडके घेवून दबा धरून बसले होते, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांना फोनवरून मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई केली. अटक केलेल्यांमध्ये टोगऱ्या पाच्या भोसले, अक्षय उर्फ धरत्या टोगऱ्या भोसले, ताज्या पाच्या भोसले (रा. सय्यदमीर लोणी, ता. आष्टी, जि. बीड), महेश उर्फ काळ््या अर्मास काळे (रा. मोरवाडी), संदीप चाच्या भोसले (रा. सय्यदमीर लोणी, ता. आष्टी, जि. बीड) पोलिसांनी त्यांच्याकडून लाकडी दांडके, मिरची पूड, एअर गन, लोखंडी सत्तुर, दोर असे साहित्य जप्त केले. या कारवाई दरम्यान चाचा पाच्या भोसले, बोरमन उर्फ सचिन सुरेश भोसले हे दोघे पसार झाले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब काकडे यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला उपनिरीक्षक स्वाती देवडकर तपास करीत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, हेड कॉन्स्टेबल मधुकर शिंदे, दादासाहेब काकडे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, विशाल अमृते, सागर सुलाने, नामदेव जाधव, बबन बेरड यांनी सापळा रचला होता. (प्रतिनिधी)