दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
By Admin | Updated: April 25, 2016 23:20 IST2016-04-25T23:13:04+5:302016-04-25T23:20:47+5:30
अहमदनगर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली.

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद
अहमदनगर : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. टोळीकडून तीन मोटारसायकलसह ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नगर-पुणे रोडवरील केडगाव फाट्याजवळ ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत तात्यासाहेब अण्णासाहेब फुलमाळी (वय २३), अनिल सोपान जाधव (वय १८), शिवाजी हरिभाऊ जाधव (वय २०), गोरख अण्णा फुलमाळी (वय २६), काळू विठ्ठल जाधव (वय ३२), बाळू भाऊसाहेब जाधव (वय २५, धंदा-मजुरी, रा. उंबरी, मोकळओहळ, ता. राहुरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडे तीन मोटारसायकली, कुऱ्हाडीचा दांडा, कुऱ्हाडीचे पाने, कोयते, गलोल, पाईप असा ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
केडगाव परिसरात रात्री पोलिसांची गस्त सुरू असताना केडगाव-सोनेवाडी परिसरात सात संशयित फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सात जणांची कसून झडती घेतली असता त्यांच्याकडे शस्त्रे आढळून आली. पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी उपनिरीक्षक गजानन करेवाड तपास करीत आहेत.
कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी प्रताप भगवान गायकवाड (वय २६, रा. वाघ गल्ली, नालेगाव) याला सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी रविवारी रात्री अटक केली. फरार असलेल्या गायकवाड याला पाटील यांनी सापळा लावून पकडले.
(प्रतिनिधी)