डंपर चोरी करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:20 IST2021-01-23T04:20:42+5:302021-01-23T04:20:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथील दादा शहाजी रोहमारे या पेट्रोलपंपावरून सतीश पुरषोत्तम देशमुख (रा. ...

The gang that stole the dumper is gone | डंपर चोरी करणारी टोळी गजाआड

डंपर चोरी करणारी टोळी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथील दादा शहाजी रोहमारे या पेट्रोलपंपावरून सतीश पुरषोत्तम देशमुख (रा. छत्रपती कॉलनी ता. गेवराई जि. बीड) यांच्या मालकीचा दहा टायर डंपर (क्र. एम. एच. २४ जे. ७००८) हा २ जानेवारीला चोरी गेला होता. तशी फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात १० जानेवारीला दाखल करण्यात आली होती.

त्यावर या चोरीचा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी शिताफीने तपास करून डंपर चोरी करणाऱ्या टोळीतील पाच आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून चोरीस गेलेला १० लाख रुपये किमतीचा डंपर हस्तगत केला आहे. वरील पाचही आरोपीना पोलिसांनी गजाआड केले आहे.

या कारवाईत पोलिसांनी राहुल कैलास घनघाव, अशोक अर्जुन आहेर (दोघे रा. भोजडे ता. कोपरगाव), प्रताप ऊर्फ पप्पू रमेश काटे, रोहित संजय घाटे ( दोघे रा. धोत्रे ता. कोपरगाव) या चौघांसह चोरीचा डंपर खरेदी केलेल्या फिरोज मन्सूर शेख (रा. चाळीसगाव जि. जळगाव) यांना अटक केली आहे. या पाचही आरोपींना शुक्रवारी (दि.२२) कोपरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत आरोपीना पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन बाबर, इरफान शेख, पोलीस कॉन्स्टेबल जयदीप गवारे यांच्या पथकाने केली आहे.

फोटो२२- डंपर चोरी टोळी- कोपरगाव

220121\1811-img-20210122-wa0030.jpg

चोरीस गेलेल्या डंपरसह टोळीतील अटक केलेल्या आरोपीसह पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव, उप निरीक्षक सचिन इंगळे, जयदीप गवारे, विजय पाटील. 

Web Title: The gang that stole the dumper is gone