ससे पकडणारी सहा जणांची टोळी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:33 IST2021-02-05T06:33:29+5:302021-02-05T06:33:29+5:30
पारनेर : तालुक्यातील पानोली घाटामध्ये ससे पकडणारी टोळी पारनेर वन विभागाने सोमवारी पकडली. याप्रकरणी पारनेर तालुक्यातील वासुंदे ...

ससे पकडणारी सहा जणांची टोळी पकडली
पारनेर : तालुक्यातील पानोली घाटामध्ये ससे पकडणारी टोळी पारनेर वन विभागाने सोमवारी पकडली. याप्रकरणी पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील ६ जणांना अटक करण्यात आली आहे. एका वाहनासह जाळे जप्त करण्यात आले आहे. त्या सर्वांना पारनेर न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत कोठडी दिली आहे.
पानोली घाट येथे ससे पकडण्यासाठी काही माणसे आली असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळली होती. ही माहिती मिळताच उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, सुनील पाटील, सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संदीप भोसले, वनपरिमंडल अधिकारी, अश्विनी सोळंके, निर्मला शिंदे, उमाताई केंद्रे, वनरक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी पानोली घाट येथे सोमवारी छापा टाकला असता भाऊ गणपत मधे (वय ५५), सीताराम गणपत दुधवडे, सोमनाथ जाधव, ताईबाई सोमनाथ जाधव, भीमाबाई मधे, सावित्रीबाई दुधवडे (सर्व रा. वासुंदे, ता. पारनेर) यांच्याकडे तीन ससे आढळून आले. ससे पकडण्यासाठी लागणारे जाळे आदी साहित्य जप्त केले. याप्रकरणी सहा जणांना पारनेर न्यायालयात हजर केले असता ४ फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
....
हरणांच्या शिकारीकडे दुर्लक्ष
पारनेर वन विभागाने ससे पकडणारी टोळी पकडली. पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती, सिद्धेश्वरवाडी, वडनेर हवेली, वडझिरे, भाळवणी, ढवळपुरी, वनकुटे, पळसपूर, पोखरीसह अनेक गावांमध्ये हरणांची शिकार होत असल्याची चर्चा आहे. पारनेर व टाकळीढोकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असून अधिकाऱ्यांच्या गस्ती सुध्दा बंद असल्याची माहिती आहे.