लुटारूंची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 11:38 IST2018-10-13T11:37:55+5:302018-10-13T11:38:00+5:30

शहरातील केडगाव बायपास येथे लुटमारीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या आठ जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी शुक्र्रवारी पहाटे अटक केली. यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे.

Gang of robbers | लुटारूंची टोळी गजाआड

लुटारूंची टोळी गजाआड

अहमदनगर : शहरातील केडगाव बायपास येथे लुटमारीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या आठ जणांच्या टोळीला कोतवाली पोलिसांनी शुक्र्रवारी पहाटे अटक केली. यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे.
दिनेश उर्फ गणेश किसनजी वाघाडे (वय २५), शेख सलीम शेख बसीर (वय ३८), शुभम दुर्योधन ओळींबे (वय ३०), देवेश दिवाकर खडसे (वय १९), सुमित्रा प्रमोद नाडे (वय ५०), राणी अजय हातागडे (वय ३३), ज्योती सोनू उपाध्ये (वय २५), रूबीना सलिम शेख असे अटक केलेल्यांची नावे आहेत. या टोळीकडे लोखंडी कटावणी, गज, लाकडी दांडे, मिरची पावडर आदी साहित्य आढळून आले आहे. अटक केलेल्या आरोपींवर वर्धा पोलीस ठाण्यात चैन स्रॅचिंग, पिक पॉकेटिंग आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीनकुमार गोकावे, उपनिरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस नाईक तागड, प्रशांत पवार, प्रमोद लहारे, चेतन मोहिते, काकडे, रेश्मा शिंदे, होमगार्ड शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Gang of robbers