हापसे हे नगर शहरातील माळीवाडा येथून राहुरी येथे जाण्याकरिता गाडीने निघाले असता पाचजण पॅसेंजर म्हणून त्यांच्या गाडीत बसले. त्या अनोळखी लोकांनी हापसे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून एटीएम कार्ड व क्रेडिट कार्ड हिसकावून घेतले, तसेच त्यांची चारचाकी गाडी घेऊन पळून गेले. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील कोतवालीचे निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकाने तपास सुरू केला. मानगावकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्ह्यातील हे आरोपी पुणे, चाकण, शिरूर कासार परिसरात थांबले होते. पथकाने तेथे सापळा लावून बाबासाहेब उर्फ बाबू बाळू शिंदे, विश्वजित सिद्धेश्वर पवार, रमेश कचरू आघाव, योगेश संजय आघाव (सर्व रा. शिरूर कासार, जि. बीड) यांना ताब्यात घेतले. त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे. या आरोपींकडून फिर्यादीची चारचाकी गाडी, क्रेडिट कार्ड असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दरोडा टाकून पसार झालेली टोळी २४ तासांत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:28 IST