शेळ्या चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ
By Admin | Updated: July 19, 2014 00:35 IST2014-07-18T23:18:24+5:302014-07-19T00:35:09+5:30
श्रीगोंदा : लोणीव्यंकनाथ, शिरसगाव बोडखा शिवारात शेळ्या चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठ दिवसात ४० शेळ्या चोरून नेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

शेळ्या चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ
श्रीगोंदा : लोणीव्यंकनाथ, शिरसगाव बोडखा शिवारात शेळ्या चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठ दिवसात ४० शेळ्या चोरून नेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
हीे टोळी कारमधून येऊन शेळ्या लांबविते, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. ही टोळी पकडण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री जागे रहावे लागत आहे.
रवींद्र वडवकर, दत्ता काकडे, एकनाथ गोरखे, सुनील जगताप, बाबा जगताप आदी शेतकऱ्यांच्या शेळ्या आतापर्यंत चोरीस गेल्या आहेत. गेल्या वर्षी आलिशान होंडा सिटी कारमधून शेळ्या चोरुन नेणाऱ्या मुंबईतील टोळीचा श्रीगोंदा पोलिसांनी पर्दाफाश केला होता.
शेळ्या चोरणाऱ्या कारमधून ही टोळी अनेकांनी पाहिली असून तशी तक्रारही काही शेतकऱ्यांनी पोलिसात दिली. (तालुका प्रतिनिधी)