गणेश विसर्जनप्रसंगी मोहळाचा हल्ला
By Admin | Updated: April 12, 2023 18:38 IST2014-09-04T23:06:23+5:302023-04-12T18:38:37+5:30
श्रीगोंदा : बेलवंडी शुगर येथील इंदिरा गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या गणेश विसर्जनप्रसंगी मोहळाच्या माशांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

गणेश विसर्जनप्रसंगी मोहळाचा हल्ला
श्रीगोंदा : बेलवंडी शुगर येथील इंदिरा गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या गणेश विसर्जनप्रसंगी मोहळाच्या माशांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत.
इंदिरा गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या गणपतीची
विसर्जन मिरवणूक संपून विहिरीच्या काठावर आरती चालू असताना मोहोळ उठून माशांनी विद्यार्थी व प्राध्यापकांवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने सर्वांचीच पळापळ झाली.
संगीत तज्ज्ञ अनिल ननवरे यांनी डीजेच्या गाडीखाली आश्रय घेतला. मात्र माशांनी घेतलेल्या चाव्यामुळे बिपीन इथापे रा. बेलवंडी या विद्यार्थ्यांसह अन्य दोन विद्यार्थी जखमी झाले. या घटनेनंतर घटनास्थळी एकच घबराटीचे वातावरण पसरले होते.
या घटनेनंतर या विहिरीत गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)