जातेगावमध्ये एक गणपती; श्रीरामपुरमध्ये चिमुकल्यांनी धरला लेझीमवर ठेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 14:29 IST2017-08-25T14:29:28+5:302017-08-25T14:29:51+5:30
सुपा/ श्रीरामपूर : पारनेर तालुक्यातील नगर पुणे रोडवरील जातेगावकरांनी ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा याही वर्षी अबाधित ठेवली असून ...

जातेगावमध्ये एक गणपती; श्रीरामपुरमध्ये चिमुकल्यांनी धरला लेझीमवर ठेका
सुपा/ श्रीरामपूर : पारनेर तालुक्यातील नगर पुणे रोडवरील जातेगावकरांनी ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा याही वर्षी अबाधित ठेवली असून गावच्या मारुती मंदिरातील सभामंडपात गणेश मूतीर्ची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वर्षी गावात दैनिक लोकमत आयोजित ‘ती’ चा गणपती उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या वर्षी पहिल्यांदा पुजेचा मान महिलेला देऊन त्यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठपणा करून आरती होणार आहे. स्त्रीला गौरी, दुर्गा, आदिशक्ती म्हणून संबोधतो़ परंतु उत्सवात मात्र ‘ती’ला बाजूला ठेवण्याची परंपरा थांबवण्यासाठी ‘लोकमत’ने सुरु केलेला ‘ती’चा गणपती उपक्रम जातेगावकरांनी हाती घेतला आहे.
गावातील जेष्ठ नागरिक व तरुण यांच्या प्रयत्नातून एक गाव एक गणपती द्वारे गावात एकोपा निर्माण करण्यात यश मिळवले आहे.या उत्सवाचा निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच महिला माताभगीणीसाठी कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे सांगण्यात आले. गणेशोत्सवासाठी विशाल फटांगडे, संतोष ढोरमले, अविनाश ढोरमले, संदीप औटी, मुन्ना पठाण, लक्षमण औटी, विजय ज-हाड, ज्ञानदेव पोटघन, बन्शी ढोरमले यांच्यासह युवक प्रयत्नशील आहेत.
श्रीरामपूर येथील नवीन मराठी शाळेतील बालगोपाळांनी लेझीमवर ठेका धरीत गणरायाचे स्वागत केले़ मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी चिमुकल्यांनी गावातून मिरवणूक काढून ‘श्रीं’ची मूर्ती आणली़ मिरवणुकीत चिमुकल्या मुली, मुलींनी लेझीमवर धरलेला ठेका सर्वांचे आकर्षण ठरला़
श्रीरामपूर येथे विविध मंडळे, शाळा, महाविद्यालये यांच्यासह विविध संस्था तसेच घरोघर गणेशाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले़ श्री गणेशाची विधिवत पुजा करुन प्रतिष्ठापना करण्यात आली़