रांधे येथे गहांडुळे, भंडारीचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:30 IST2021-02-26T04:30:14+5:302021-02-26T04:30:14+5:30
अळकुटी : राष्ट्रीय क्राॅस कन्ट्री स्पर्धेत महाराष्ट्राच्या वतीने १८ वयोगटात करण संदीप गहांडुळे आणि १६ वयोगटात साक्षी भंडारी हिची ...

रांधे येथे गहांडुळे, भंडारीचा सन्मान
अळकुटी : राष्ट्रीय क्राॅस कन्ट्री स्पर्धेत महाराष्ट्राच्या वतीने १८ वयोगटात करण संदीप गहांडुळे आणि १६ वयोगटात साक्षी भंडारी हिची निवड झाली होती. चंदीगड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत करण गहांडुळे याने तृतीय, तर साक्षी भंडारी हिने चतुर्थ क्रमांक मिळविला. या दोघांनाही प्रशिक्षक श्रीरामसेतू आवारी, समीर शेख यांनी मार्गदर्शन केले. करण गहांडुळे, साक्षी भंडारी, शीतल भंडारी, श्रीरामसेतू आवारी, समीर शेख यांचा ग्रामस्थांनी सन्मान केला. यावेळी डॉ. भास्कर शिरोळे, मेजर अशोक आवारी, अनिल रामचंद्र आवारी, युवा सेना उपाध्यक्ष अजित आवारी, सुहास आवारी, रवी खैरे, युवा उद्योजक अनिल लक्ष्मण आवारी, विजय झिंजाड, नुराभाई कुरेशी आदी उपस्थित होते.